जिल्ह्यातील लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 20, 2017 04:42 AM2017-05-20T04:42:23+5:302017-05-20T04:42:23+5:30
मुरु ड तालुकयात संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ८२८ आहेत. तर श्रावण बाळ योजनेचे ३०३ लाभार्थी आहेत. गोर गरीब कुटूंबाना आधार म्हणून
- संजय करडे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुरु ड जंजिरा : मुरु ड तालुकयात संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ८२८ आहेत. तर श्रावण बाळ योजनेचे ३०३ लाभार्थी आहेत. गोर गरीब कुटूंबाना आधार म्हणून शासनाकडून त्यांना अनुदान दिले जाते. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६०० रु पये, श्रावण बाळ योजनेअंर्गत ४०० रु पये प्रत्येक कुटूंबाना मदत दिली जाते. मात्र गेल्या चार महिन्यापासून या लाभार्थींना अनुदान मिळालेले नाही.
दोन्ही योजना राज्य शासनाच्या असून नियोजित रक्कमेची तरतूदही राज्य शासनाकडून केली जाते. चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कमच न आल्याने त्याचे वाटप रखडले आहे.
अशीच परिस्थती केंद्र शासनाच्या चालवण्यात येणार्या वृद्धापकाळ योजना, विधवा महिलांना देण्यात येणार्या अनुदानाबाबत आहे. चार मिहने पैसे प्राप्त न झाल्याने गरीब कुटुंबाना संसार कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण आहे. शासकीय अधिकारी पोटतिडकीने आमचे प्रश्न समजून घेत नाही. त्यांनी काम करो न करो, त्यांना पगार मिळतोच,मात्र आम्हाला अनुदान देण्यात नेहमीच दिरंगाई होत असल्याचा प्रश्न यावेळी नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने लाभार्थी असून सर्वांनाच चार महिन्यापासून अनुदान वाटप झालेले नाही. मुरु ड तालुक्यात केंद्र शासनाच्या वृधापकाळ योजनेचे ३१७ तर विधवा योजनेचे २७ लाभार्थी असल्याची माहिती मुरु ड संजय गांधीचे नायब तहसीलदार दिलीप यादव यांनी दिली.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता, राज्य व केंद्र अशी दोन्ही बिले राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त आहे. परंतु केंद्र शासनाकडून पैसे मिळाले नाहीत. मे अखेर पर्यंत पैसे मिळताच लाभार्थी याना वाटप करू, असे तेथील अव्व्ल कारकून संगीता दराडे यांनी सांगितले.
चार दिवसापूर्वीच राज्य शासनाकडून मिळणारे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे पैसे जमा झाले आहेत. लवकरच हे पैसे लाभार्थींना वाटप करण्यात येतील. मात्र केंद्र शासनाचे अनुदान अद्याप आलेले नाही. ते प्राप्त होताच तेही पैसे लवकरच वाटप करू.
- दिलीप यादव,
नायब तहसीलदार, मुरुड