योजना शासनाच्या ताब्यात दिल्याने फायदा, खासगी खारभूमी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:20 AM2017-12-01T07:20:36+5:302017-12-01T07:20:44+5:30

कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे.

 Benefit from giving government control, Private Kharbandi Scheme | योजना शासनाच्या ताब्यात दिल्याने फायदा, खासगी खारभूमी योजना

योजना शासनाच्या ताब्यात दिल्याने फायदा, खासगी खारभूमी योजना

googlenewsNext

- जयंत धुळप
अलिबाग : कोकणातील ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात गावांंना दळणवळणासाठी हे बांध उपयोगी ठरणार आहेत. परिणामी, या बांधावरून थेट शेतापर्यंत बैलगाडी वा चारचाकी वाहन पोहोचू शकणार आहे. रस्त्याअभावी निर्मनुष्य राहणारे हे सागर व खाडी किनारे यापूर्वी अतिरेक्यांची छुपी ठिकाणे झाली होती. आता या ठिकाणी स्थानिक शेतकºयांचा वावर वाढणार असल्याने ही ठिकाणे आता अतिरक्यांची छुपी ठिकाणे राहणार नाहीत. परिणामी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा सुरक्षा अनाहूतपणे मजबूत होऊ शकणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारण यंत्रणांना देखील या किनारीभागात सत्त्वर पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच या ६४ खारभूमी योजनांच्या लाभक्षेत्रात असणाºया विहिरी आणि तलावांचे पाणी गोडे होऊ न पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन, दुबार भातपिके घेणे शक्य होणार असल्याने शेतकºयांचे आर्थिक जीवनमान देखील उंचावणार आहे.
सततच्या भरती ओहोटीमुळे कमकुवत झालेल्या खासगी खारभूमी योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर भातशेती क्षेत्र बाधित झाले आहे. कोकणातील ६४ खासगी खारभूमी योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या योजनांचे काम पूर्ण झाल्यावर एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली येणार, हाच केवळ एकमेव फायदा नाही,तर त्यासोबत अनेक लाभ किनारी विशेष: खारेपाटातील शेतकºयांना होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करताना, हे सर्व मुद्दे विचारात घेऊन, खासगी योजना शासनाच्या ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वेळकार खार (ठाणे), दिवाणखाडी (भिवंडी), बारपटल (भिवंडी) या तीन खासगी योजनांचा समावेश असून, त्यातून १५९ हेक्टर भातशेती क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून त्याकरिता ३६०.९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील डोंगरे, कुंभावली, धनसर, शिरगाव, पाम टेंबी, कोतवडे आणि डहाणू तालुक्यातील वरोर या सात योजनांच्या माध्यमातून ४२१ हेक्टर भातशेती क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता ९५५.६७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १० योजनांमध्ये तोणदे (रत्नागिरी), गुहागर खालचपाट (गुहागर), तारळ (राजापूर), टेंभे (रत्नागिरी), वरवडे (ब)(रत्नागिरी), चिंचखरी फाटकवाडी (रत्नागिरी), फुणगुस (संगमेश्वर), मेढे (संगमेश्वर), कोढे (संगमेश्वर), ढोरले खेतमळी (रत्नागिरी) यांचा समावेश असून त्यायोगे ४३१.६७ हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता ११२४.८६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ योजना असून, त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील तेरावळे (ब), मागवणे मसुरे, कोठेवाडी, तुळस पाटील वाडी, खडपी वाडी, तुळस सावंतवाडा, मुणगे, परुळे कोळजाई, वेंगुर्ला आणि टेंबवली (राणेवाडी), मोहूळ गाव (देवगड) या योजनांचा समावेश असून, ५४३ हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता १५४०.७६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

या ६४ खासगी योजनांमध्ये कोकणातील सर्वाधिक ३३ खासगी खारभूमी योजना एकट्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये पेण तालुक्यातील कोप्रोली, कासू पांडापूर, दादर, पाटणी-पांडापूर, काळी सीमादेवी, बोरी, वरेडी खुंटेपाडा, शेतजुई बेणसे, डोलवी दबाबा आणि दुष्मी खारपाडा या दहा योजनांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरी, खातीवरा, मोठापाडा शहापूर, चरी गोपचरी, भिलजी बोरघर, वासखार, रांजणखार, रामराज, हशिवरे बंधारा, कालव या दहा योजनांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील वशेणी नवखार भेंडी, दिघोडा,चिखली भोम,कोणी केळवणे, पुनाडे, कडापे दांगोटी, सांगपालेखार, हरिश्चंद्र पिंपळे, गोवठणे, पिरकोण आणि हाळ (रोहा), लक्ष्मीखार तेलवडे (मुरुड),खरसई (म्हसळा) अशा या ३३ योजनांच्या माध्यमातून एकूण ४ हजार ७८०हेक्टर क्षेत्र पुनर्प्रापित होणार असून, त्याकरिता १०९ कोटी ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title:  Benefit from giving government control, Private Kharbandi Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड