शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

महाड तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त

By admin | Published: February 23, 2017 6:17 AM

जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी मंगळवारी पार पडलेल्या

महाड : जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानानंतर गुरुवारच्या मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाड तालुक्यात चौरंगी लढती झाल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी प्रांजली सोनावणे-पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे. गुरुवारी सकाळी १० वा. पासून शिवाजी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून मतमोजणी अधिकारी, मतदान मोजणी प्रतिनिधी तसेच पत्रकारांशिवाय अन्य कोणासाठी मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी स्पष्ट केले.गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला पंचायत समितीमध्ये प्रत्येकी पाच असे समसमान जागांवर यश मिळालेले होते. तर जिल्हा परिषदेच्या पाचपैकी चार जागा यंदा शिवसेनेने तर केवळ एका जागेवर काँग्रेसला यश मिळाले होते. मात्र यंदा शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चौरंगी लढतीमुळे या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आ. भरत गोगावले व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून कोणत्या पक्षाला विजयाचा कौल देणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)