Mahad Building Collapse: मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 07:34 PM2020-08-24T19:34:03+5:302020-08-24T19:36:20+5:30
Mahad Building Collapse Updates: घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे.
रायगड - महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली 47 नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या दुर्घटनेत किती जण जखमी झाले याचा आकडा अद्याप समजला नाही. ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. कोसळलेल्या इमारतीचा मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. या ढिगाऱ्याखाली कोणी नागरिक दाबले गेले आहेत का ? हे या दरम्यान कळेल.
महाड शहरातील साळीवाडा नाका येथील तारीक गार्डन हि पाच मजली इमारती साेमवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास काेसळली. ढिगाऱ्याखाली सुमारे 200 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या पुण्याहून महाडकडे रवाना झाल्या आहेत.
महाड शहरातील हापुस तलावाजवळ तारीक गार्डन हि इमारत उभारण्यात आली हाेती. इमारतीचे दाेन पिलर कमकुवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या इमारतीमध्ये 47 फ्लॅट असल्याचे बाेलले जातय. या ठिकाणी सुमारे 200 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत 17 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दल, पाेलिस, स्थानिक प्रशासन हजर आहे. त्यांनी मदत कार्य सुरु केले आहे. जखमींवर महाडच्या स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.दरम्यान, सदरची इमारत पाच वर्षापूर्वी बांधण्यात आली हाेती. तसेच मुंबईतील दाेन बांधकाम व्यावसायिकांनी इमारत बांधल्याचे बाेलले जातय. इमारतीमधील ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या 8 पैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. सुहास माने यांनी दिली.
रायगड - महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळील पाच मजली इमारत कोसळली 47 नागरिक अडकल्याची भीती
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!
'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश