- कांता हाबळे ।नेरळ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-पळसदरी मार्र्गे खोपोली राज्यमार्गाचे काम करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे; परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, वारंवार मलमट्टी करावी लागत आहे. या मलमट्टीसाठीही लाखो रु पयांचे टेंडर काढले जात आहेत. मात्र, रस्त्याची अवस्था जैसे थे असून, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाºयांची आर्थिक स्थिती मात्र नक्कीच सुधारत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.राज्यमार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिक आमदार सुरेश लाड यांनीही विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडून प्रश्न उपस्थित केला होता; परंतु तरीसुद्धा राज्यमार्गाच्या कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. प्रसार माध्यमांकडूनही राजमार्गाच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच आवाज उठविण्यात आला आहे; परंतु संंबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हितसंबंधांमुळे हा आवाज दडपला जात आहे. फारच विरोध झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांवर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात येते. कर्जत-पळसदरी मार्गावर वर्दळ वाढली असून, बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने चालक हैराण झाले आहेत.अवघ्या काही दिवसांपूर्वी याच मार्गावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने, तसेच खड्डे चुकविताना दुचाकीचा अपघात झाला होता. यात एका प्रवाशाला जीवही गमवावा लागला आहे. तरीसुद्धा संबंधित प्रशासन अािण लोकप्रतिनिधी याबाबत फारसे गंभीर नसल्यानेच नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूतकर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरवस्थेला संबंधित ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांचे हितसंबंध कारणीभूत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.त्यामुळे अशा ठेकेदार आणि अधिकाºयांच्या हितसंबंधांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत; परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न चालकांसह स्थानिकांनाही पडला आहे.दर्जेदार काम महत्त्वाचेकर्जत-मुरबाड राज्यमार्गाचे रुंदीकरणही तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने या राज्यमार्गाचे काम चांगल्या दर्जाने केल्याने तीन पावसाळे उलटूनही आजही हा राज्यमार्ग सुस्थितीत आहे. मात्र, कल्याण-कर्जत-पळसदरी-खोपोली राज्यमार्ग अतिपावसामुळे खड्डेमय झाला आहे.
कोट्यवधींचा राज्यमार्ग खड्ड्यांत, कर्जत-कल्याण मार्गाचे काम निकृष्ट, मलमपट्टीच्या नावे लाखोंच्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 5:33 AM