महाड एसटी आगाराला कोट्यवधींचा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:24 AM2020-07-29T00:24:40+5:302020-07-29T00:24:45+5:30

चार महिन्यांपासून वाहतूक ठप्प : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन सेवा बंद

Billions of rupees hit Mahad ST depot | महाड एसटी आगाराला कोट्यवधींचा आर्थिक फटका

महाड एसटी आगाराला कोट्यवधींचा आर्थिक फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, संपूर्ण देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार गेल्या चार महिन्यांपासून ठप्प झाले आहेत. महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी समजली जाणारी राज्य परिवहन सेवाही बंद करण्यात आली. महाड आगारातून दर दिवशी चारशेपेक्षा अधिक एसटीच्या फेऱ्या मारल्या जात होत्या, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून एकही एसटी बस रस्त्यावर धावू शकली नाही. यामुळे एकट्या महाड आगराचे चार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे एसटी बसस्थानक म्हणून महाड स्थानकाला महत्त्व आहे. कोकणामध्ये जाणारी प्रत्येक बस या बसस्थानकावर थांबविण्यात येते.
शिवाय महाड शहर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळे असल्याने प्रतिदिन शेकडो पर्यटक एसटीने महाडला ये-जा करत असतात. दर दिवशी महाड आगारात चारशेपेक्षा अधिक बसेस मुंबई, गोवा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जातात. त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासामध्यही महाड बसस्थानकावर थांबल्याशिवाय पुढे जात नाहीत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्या एप्रिल महिन्यापासून एसटीच्या सर्व फेºया बंद आहेत.
एसटी बसेस महाड आगारात एकाच जागेवर उभ्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या महाड स्थानकावरून गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या संचारबंदीच्या काळामध्ये एकही बस रस्त्यावर धावली नाही. या आगारातून दरदिवशी लांब आणि स्थानिक पल्ल्याच्या ३४७ फेºया मारल्या जातात. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, बोरीवली, पुणे, नाशिक, जळगाव, अक्कलकोट आदी लांब पल्ल्याच्या बसेस या बसस्थानकावरून सोडण्यात येत असल्याने, या स्थानकाचे उत्पन्न महिन्याला दोन कोटींपेक्षा अधिक होते.
शिवाय शैक्षणिक सहली, लग्न सोहळे आदींसाठीही एसटीच्या बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात होत्या. यातूनही महामंडळाला नफा मिळत होता. मात्र, ऐन सुट्टीच्या आणि लग्नसराईतच कोरोनामुळे संचारबंदी लागल्याने एसटीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

एसटीला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने चिंता
१एप्रिल मे महिन्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. त्याचप्रमाणे, लग्नसराईमुळेही एसटीचे उत्पन्न वाढते, परंतु लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद करण्यात आल्याने, महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन महिन्यांनंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये एसटी धावण्यास सुरुवात झाली आहे.
२करण्यात आलेली असली, तरी प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, एसटीचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एसटी बसेसमध्ये प्रवासी बसण्यास अद्याप तयार नाहीत, यामुळे महाड, पनवेल आणि माणगाव अशा फेºया संचारबंदी शिथिल केल्यानंतर सुरू करण्यात आल्या.
३ मात्र, याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. त्यातच पुन्हा संचारबंदी लागल्याने, आता तर एसटी बसेस सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून, हा तोटा लवकर भरून येणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Billions of rupees hit Mahad ST depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.