संजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील लोकांनी आपल्या सहा सिलिंडर असणाऱ्या मोठ्या बोटी आगरदांडा येथील बंदरात शाकारून ठेवल्या होत्या; परंतु वादळी वाºयाने येथील २० बोटींचे मोठे नुकसान केले आहे. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे येथील मोठ्या बोटी एकमेकांवर आदळून फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट नवीन उभरणीसाठी किमान ३५ लाखांचा खर्च येत असतो. अशा वादळामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २० बोटी फुटल्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुरूड शहरातील मासळी मार्केटच्या मागे मासळी विक्रीसाठी लिलाव करण्यासाठी मोठ्या पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली होती; परंतु या वादळात ती शेड भुईसपाट झाली आहे. चार वर्षांपूर्वीच ही शेड सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली होती; परंतु या वादळात ती पडल्याने मोठे नुकसान कोळी समाजाला सहन करावे लागले आहे.
याबाबत अधिक माहिती सांगताना कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी या शेडमधून मासळी विक्री चालत असे. मात्र वादळामुळे शेड पडली असून शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.नांदगाव मुरुड सर्वे काशीद येथील मोठमोठ्या सुपारी व नारळाच्या बागा आहेत; परंतु वेगाने वाहणाºया वाºयाने सुपारीचे झाडे मुळासकट पडल्याने येथील बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक सुपारीचे झाड १० वर्षांनंतर पीक देते; परंतु या वादळाने सदरची झाडे पडल्याने सुपारीच्या पिकात मोठी घट होणार आहे. मुरुड तालुक्यात ९०० हेक्टर जमिनीवर नारळ-सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. त्यापैकी सर्वच बागायत जमिनीतील सुपारीची झाडे सर्वाधिक पडल्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नांदगाव येथील बागायतदार चिंतामणी जोशी यांनी या नारळ-सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी विकसित केल्या होत्या. या वादळामुळे सर्व झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अतीव दु:ख झाले आहे. सर्व बागायतदारांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एनडीआरएफने केले रस्ते मोकळेमहसूल प्रशासनाने मुरूड तालुक्यातील सुमारे ३,४५० लोकांना धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जीवितहानी झाली नाही; परंतु मालमतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी वडाची झाडे उन्मळून पडली. ती बाजूला करण्यासाठी एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक मनोज घोष यांच्या नेतृत्वाखाली २२ जवानांची टीम मुरूडमध्ये आली होती, त्यांनी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे कटरच्या साह्याने तोडून रस्ता मोकळा करून दिला आहे.