जैवविविधता उद्यान सुरू

By admin | Published: April 14, 2016 12:09 AM2016-04-14T00:09:07+5:302016-04-14T00:09:07+5:30

अलिबाग तालुक्यातील वडखळ-अलिबाग मार्गावर असलेल्या तीनवीरा धरणाच्या कुशीत जैवविविधता उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान शापूरजी पालनजी आणि रायगड जिल्हा

Biodiversity Park Start | जैवविविधता उद्यान सुरू

जैवविविधता उद्यान सुरू

Next

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील वडखळ-अलिबाग मार्गावर असलेल्या तीनवीरा धरणाच्या कुशीत जैवविविधता उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान शापूरजी पालनजी आणि रायगड जिल्हा परिषदेचा एकत्रित उपक्रम आहे. अगोदरच निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी आणखी एका अनमोल नैसर्गिक वनस्पतींचे ठिकाणाने महाराष्ट्रात वेगळी ओळख होणार आहे.
पर्यावरणाचे संवर्धन आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून शापूरजी पालनजी आणि जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी शापूरजी आणि पालनजी यांनी रायगड जिल्ह्यात जवळ जवळ तीन लाख ७५ हजार वृक्षलागवड केली आहे. तीनवीराच्या एक एकर उद्यानात ५० हजार झाडांची एकूण ५०० पेक्षा जास्त जातींची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सतरा विभागात निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. यामध्ये फुलझाडे, भाजी, औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थांच्या वनस्पती तसेच दुर्मीळ वनस्पती भारतातील अन्य ठिकाणाहून आणून लागवड सुंदररित्या करण्यात आली आहे. तसेच प्राणी, पक्षी, कीटक यांना फिरण्यासाठी हे एक प्रकारचे त्यांच्या दृष्टीने घरच आहे. तसेच पर्यावरणस्रेही यांनी या उद्यानाचा आनंद काळजीपूर्वक घ्यावा. या उद्यानातील वनस्पतींच्या माहितीमुळे येथील पूर्ववत असलेल्या वनस्पतींचे संवर्धन होण्यास मदत होईल.
या उद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील दिव्यांचे आकारही रुईसारख्या भारतीय प्रजातीच्या, कमळाच्या, पथदिवे काटेसावर, तर झुंबर खैराच्या बियांसारखे आहेत. हे उद्यान म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना जीवशास्त्राविषयी अभ्यास सांगणारे ठिकाण ठरणार आहे.
या उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जरीन कमिसरियत, डॉ. रशने पारदीवाला आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Biodiversity Park Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.