पनवेल : बुद्धपौर्णिमेला वनक्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रान कोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षीही या वर्षी अधिक संख्येने दिसले आहेत.गेल्या वर्षी करण्यात आलेल्या गणनेत कर्नाळा अभयारण्यात २५ प्रजातींच्या प्राणी आणि पक्ष्यांची नोंद झाली होती. या वर्षी यात वाढ झाली असून प्राणी व पक्ष्यांच्या ४१ प्रजाती आढळून आल्या आहेत. वन विभागाने १२ हजार चौरस किलोमीटर असलेल्या कर्नाळा अभयारण्यातील पक्षी व वन्यप्राण्यांची मोजदाद नुकतीच पूर्ण केली.मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कर्नाळा अभयारण्यात विविध वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या वन्य प्राण्यांची वन विभागाच्या वतीने दरवर्षी बुद्धपौणिमेला पारंपरिक पद्धतीने गणना केली जाते. त्यानुसार अलीकडेच म्हणजे ३0 एप्रिल आणि १ मे २0१८ रोजी दुपारपर्यंत या अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांची गणना करण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाºयांसह निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि अभयारण्यालगतच्या गावातील ग्रामस्थ यात सहभागी झाले होते.गणनेत आढळलेलेपक्षी आणि प्राणीच्बुलबुल ९, कोतवाल ३, किंगफिशर ४, हळद्या ९, तुरेवाला बुलबुल १0, सनवर्ड १२, होला ८, वेडाराघू २, रातवा २, नीळकंठ २, निलांवर ६, हरियाल ३, ड्रगो २, कावळा १, महाभ्रुंगराज २, मोनार १, श्यामा ४, तकाचोर १, निखर २, सुतार ७, शिखरा २, घार १, बगळा ९, रानकोंबड्या ५, डोमकावळा १, बारबेट १, लबई१, सातभाई ५, स्वर्गीय नर्तक १, कोकीळ २, वटवाघूळ २, सुतार ५, जटायू २, टिटवी २बिबट्याची नोंद नाहीच्कर्नाळा अभयारण्यात मागील वर्षी १५0 प्राणी व पक्ष्यांची गणना करण्यात आली होती. यावर्षी ही संख्या १८१ वर गेली आहे. मात्र, यात बिबट्याची नोंद करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे कर्नाळा अभयारण्य परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळल्याचे येथील रहिवासी सांगतात. वनविभागाने देखील त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, गणनेच्या काळात बिबट्या आढळला नसल्याने त्याची नोंद करण्यात आलेली नाही.या प्राणिगणनेत पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आढळली, याचा अर्थ या ठिकाणचा नैसर्गिक अधिवास व खाद्य त्यांच्यासाठी चांगले आहे, असे म्हणता येईल. या गणनेच्या काळात बिबट्या या परिसरात आढळला नाही. मात्र, बिबट्याच्या वावर असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.- पी. पी. चव्हाण,विभागीय वन अधिकारीप्राणीमाकड १६हनुमान लंगूर २४रानडुक्कर 0७भेकर 0१सरपटणारे प्राणीसरडा 0१धामण 0१घोरपड 0२फणसाडमध्येही गणनेला सुरूवातआगरदांडा : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगाव जवळील फणसाड अभयारण्यात प्राण्यांच्या गणनेला सुरुवात करण्यात आली आहे.सुमारे ५४ कि. मी. क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार आहे. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे.अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यात बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरू, पिसोरी, ससा, काळामांजर, रानमांजर, जवादा, साळिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी, २७ प्रकारचे साप, १६४ प्रकारचे रंगबिरंगी पक्षी, ९० प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्ल्यू मॉरमॉन, मॅप आदी दिसून येतात. त्याचबरोबरच नाग, फुरुसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, अजगरसारखे बिनविषारी साप येथे आढळतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राण्याच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी वर्तवली आहे. यंदा प्राण्यांना पाण्याचे स्रोत २७ ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली.
कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 7:05 AM