बिरवाडी-खरवलीत विजेचा खेळखंडोबा
By admin | Published: July 21, 2015 04:54 AM2015-07-21T04:54:03+5:302015-07-21T04:54:03+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी- खरवली परिसरात गेले दोन दिवस विद्युतपुरवठा अनिश्चित काळाकरिता खंडित झाला आहे. गेले दोन दिवस
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी- खरवली परिसरात गेले दोन दिवस विद्युतपुरवठा अनिश्चित काळाकरिता खंडित झाला आहे. गेले दोन दिवस बिरवाडी-खरवली परिसरातील विद्युतपुरवठा अनियमित होत असल्याने या परिसरातील नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहेत. या विभागातील महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा अथवा कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी सुरू नसल्याने विद्युतपुरवठा वारंवार खंडित राहण्याचे कोणतेही कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सस्ते यांनी पोलीस कर्मचारी पाठवून विद्युत पुरवठा खंडित होण्याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही तांत्रिक बिघाडामुळे विद्युतपुरवठा अनिश्चित काळाकरिता खंडित झाल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे. (वार्ताहर)