महाड: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना दुपारी संगमेश्वर पोलिसांनी अटक करून महाड येथे नेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत महाड येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. महाडसह नाशिक आणि पुणे येथेही तक्रार दाखल करण्यात आल्या असल्या तरी, महाड येथील रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर नारायण राणे यांना हजर करण्यात आले. पोलिसांकडून नारायण राणे यांच्या सात दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पोलिसांचा युक्तीवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. (bjp narayan rane gets bail from mahad court for criticism about cm uddhav thackeray)
“सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला
महाड न्यायालयात सुमारे २० मिनिटांपासून अधिक वेळ दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद करण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. नारायण राणे यांचे विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घटनात्मक पदाची पायमल्ली करणारे आहेत. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असून, जबाबदार व्यक्तीने अशी विधाने करणे कितपत योग्य आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. तसेच ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...
सर्व प्रक्रिया रितसरपणे केली नाही
नारायण राणेंच्या बाजूने कुडाळ येथील वकील संग्राम देसाई यांनी काम पाहिले. नारायण राणे यांना अटक करताना रितसर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री असून, त्यांच्याविरोधात चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. तसेच अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिलेली नाही, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. तसेच नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. दुपारी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचाही दाखला यावेळी न्यायालयाला देण्यात आला. अखेर पोलीस आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. जवळपास तासभर न्यायालयाचं कामकाज चालले.