रेवदंडा : येथील पोलीस ठाण्याच्या सभागृहात मागील महिन्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रेवदंडा आगरकोट ते चौल नाकादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी आंदोलन छेडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी खड्डे भरून देण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने ते स्थगित केले.आता एक महिना उलटूनही सार्वजनिक बांधकाम खात्याला आश्वासन पाळता आले नाही. त्यामुळे गुरुवारी रेवदंडा आगरकोट किल्ला भागात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अलिबागचे विलास पाटील येथे आले असताना रेवदंडा आगरकोट ते चौल नाका दरम्यान त्यांना पायी फिरवून नागरिकांना होणारा त्रास प्रत्यक्ष दाखवण्यात आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून, येत्या २० आॅगस्टपूर्वी खड्डे भरून देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आल्याने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग पंचायत समितीचे सदस्य उदय काठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी पाटील यांच्या समवेत सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सस्ते, बांधकाम खात्याचे अधिकारी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदींसह नागरिक उपस्थित होते.
भाजपाचे रास्ता रोको आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:15 AM