शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अलिबागमध्ये कडकडीत बंद; शहरातील दैनंदिन व्यवहारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:46 AM

शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरामध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील विविध संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमीच गजबजलेले अलिबाग शहर आज मात्र थांबल्याचे दिसून आले.

अलिबाग : शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरामध्ये बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील विविध संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमीच गजबजलेले अलिबाग शहर आज मात्र थांबल्याचे दिसून आले. शहरातील कापड मार्केट, किराणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, भाजी मंडई, आॅटो रिक्षा युनियन यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला.शहरातील मांडवी मोहल्ला परिसरामध्ये शुक्रवारी २७ जुलै रोजी गोहत्या झाल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. शांतताप्रिय असणाऱ्या आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा असणाºया अलिबाग शहरामध्ये असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी भाजपाचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बंदची हाक दिली होती. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागला.नेहमीच गजबजणाºया बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट होता. बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ, मारुती नाका, बालाजी नाका, जामा मशीद, मांडवी मोहल्ला परिसरातील असणारी अन्य एक मशीद, राम मंदिर, शिवाजी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एसटी स्टॅण्ड, महावीर चौक अशा प्रमुख ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.बंद असल्यामुळे विविध शाळाही बंद ठेवल्या. सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची बुधवारपासून चाचणी परीक्षा सुरू होणार होती. ती शाळा व्यवस्थापनाने पुढे ढकलली. स्कूलबसचालक-मालक, आॅटो रिक्षाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे यांनीही आपापले कामकाज बंद ठेवले होते.अलिबाग शहरामध्ये बंद पाळण्यात आल्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. प्रवासी वाहतूक करणाºया आॅटो रिक्षा संघटनांनीही बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे कामानिमित्त आलेल्यांची चांगलीच अडचण झाली. सकाळी नेहमीच गजबजणारी भाजी मंडईही पुरती थंडावली होती. मासळी मार्केट मात्र सुरळीत सुरू होते. त्याचप्रमाणे विविध सरकारी कार्यालये, सरकारी बँकांच्या व्यवहारामध्ये मात्र खंड पडला नाही. आंदोलकांनी शांततेमध्ये बंद पाळल्यामुळे अलिबाग आगारातून एसटी बसेसही सोडण्यात येत होत्या, परंतु आगारात गर्दी नव्हती.सकाळी भाजपाच्या कार्यालयाजवळ अलिबागमधील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यानंतर भजन मंडळाच्या माध्यमातून शहरातील महावीर चौकामध्ये मोठ्या संख्येने आंदोलकांनी धडक दिली. या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. महावीर चौकामध्ये आंदोलकांकडून गोमातेला वंदन करण्यात आले. अलिबागमधील नागरिक, विविध सामाजिक संघटना, रिक्षा युनियन, व्यापारी संघटना यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन बंद शांततेमध्ये पार पाडल्याबाबत भाजपाचे अ‍ॅड.महेश मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.अतिरिक्त पोलीस निरीक्षक संजयकुमार पाटील, दत्तात्रेय निघोट, रायगड वाहतूक विभागाचे प्रमुख सुरेश वराडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तामध्ये सामील होते.आरोपींना चार दिवसांची कोठडीअलिबाग : शहरात गोहत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना बुधवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवली.अब्दुस सय्यद, शराफत फकी आणि इंद्रीस चौधरी यांना शुक्रवारी २७ जुलै रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते.अलिबागमधील कोणत्याच वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेतले नाही. त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.१ आॅगस्ट रोजी त्यांची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्यांना बुधवारी न्यायालयात पुन्हा हजर केले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग