सिकंदर अन्वरे
महाड - महाड औद्योगिक वसाहती मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन या कंपनीत आज सकाळी भीषण स्पोर्ट झाला. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात नुकसान झाले असून दोन कामगार देखील जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना एम. एम. ए. सी इ टी पी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहती मधील प्लॉट नंबर मध्ये जेट इन्सुलेशन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या रियाक्टर्सचा एका मागून एक असे स्फोट होत गेले.
या स्फोटात कंपनीच्या प्लांटचे अतोनात नुकसान झाले आहे दहा वाजता लागलेली आग दुपारी बारा वाजले तरी आटोक्यात आणता आली नव्हती मात्र कंपनीमधील विक्रम डेरे, निमाई मुरमक, मयूर निंबाळकर, राहुल गिरासे, स्वप्निल आंब्रे हे कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना महाड उत्पादक संघटनेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे. यातील विक्रम ढेरे हा गंभीर रित्या जखमी झालेल्या असल्याने त्याला मुंबई येथे अधिक उपचार करता स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली.
स्पोर्ट आणि नंतर लागलेल्या आगी मुळे शेजारी असलेल्या विरल आणि एक्वा फार्म तसेच ज्वारी मधील कामगारांनी कंपनीबाहेर धाव घेतली विरल कंपनीच्या कामगारांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.