सोनसाखली चोराला शोधण्यासाठी नाकाबंदी; अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल
By निखिल म्हात्रे | Published: August 22, 2023 03:07 PM2023-08-22T15:07:24+5:302023-08-22T15:07:49+5:30
पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा मंगळसुत्र दुचाकीवरून खेचून पलायन करणाऱ्या संशयास्पद चोरट्याचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे.
अलिबाग - पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा मंगळसुत्र दुचाकीवरून खेचून पलायन करणाऱ्या संशयास्पद चोरट्याचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. सोमवारी दुपारपासून अलिबागसह अनेक मार्गावर नाकाबंदी करून चोरट्याच्या शोधात पोलीस लागले आहेत.
पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाशिवरे परिसरातील पेंढाबे जवळ आठ दिवसापूर्वी एक पादचारी महीला चालत जात असताना दुचाकीवरून धुम स्टाईलने येऊन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचेमंगळसुत्र खेचून चोरून नेले.
या प्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने सांगितलेल्या व पोलीसांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेल्या माहीतीवरून चोरट्याचा पोलीसांनी शोध सुरू केला. एक संशयीत दुचाकीवरून पोयनाडकडून अलिबागकडे गेला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. वायरलेसच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोलीस ठाण्यांना सर्तक राहण्याची सुचना दिल्या.
सोमवारी दुपारी आलेल्या सुचनेनुसार अलिबाग, रेवदंडा, मुरुड, पोयनाड, नागोठणे पोलीस तात्काळ कामाला लागले. सर्वत्र नाकाबंदी सुरु करण्यात आली. दुचाकी चालकाची कसून तपासणी चौकशी सुरू करण्यात आली. कोणाला संशयीत व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधावा असे आवाहन रायगड पोलीसांकडून करण्यात आले आहे.