250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:09 PM2020-06-24T17:09:46+5:302020-06-24T19:23:14+5:30

अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.

Blood donation camp through Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan | 250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर

250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक बांधीलकी जपत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडामार्फत आज अलिबागमध्ये रक्तदान शिबीर पार पडले. पहिल्या टप्प्यात 250 रक्ताच्या बॅग जमा करण्यात आल्या आहेत.

- आविष्कार देसाई

अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सामाजिक बांधीलकी जपत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडामार्फत आज अलिबागमध्ये रक्तदान शिबीर पार पडले. पहिल्या टप्प्यात 250 रक्ताच्या बॅग जमा करण्यात आल्या आहेत.

अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील जिल्हा रक्तपेढीची रक्त साठविण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 250 बॅग रक्त संकलित करण्यात आल्या.

तसेच गरजेनुसार पुढील टप्प्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सध्या जगावर कोरोना संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अलिबाग जिल्हा सरकारी रक्त पेढीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये. यासाठी रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे आले आहे. 

कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करताना सामाजिक अंतर राखणे तसेच सॅनिटायझरचा वापर करुन शिस्तबद्धपणे श्री सदस्यांनी रक्तदान केले. याआधी प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध शिबिरांमधून 6 हजार 939 बॅग्ज आणि परदेशातील सिंगापूर येथील शिबिरातून 60 बॅग्ज रक्त संकलित करण्यात आल्या आहेत. 

याआधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने विविध समाजपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये वृक्षलागवड-संगोपन, आपादग्रस्तांना मदत, स्वच्छता अभियान, दाखले वाटप, स्मशानभूमी, दफनभूमीची स्वच्छता, स्मशानभूीचे बांधकाम, जलपुणर्र भरण, श्रवण यंत्र वाटप, आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. दरम्यान, अलिबाग येथील रायगड जिल्हा रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनिल बंदीछोडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांमार्फत रक्त संकलीत करण्यात आले.      

Web Title: Blood donation camp through Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड