रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

By Admin | Published: June 13, 2017 03:05 AM2017-06-13T03:05:42+5:302017-06-13T03:05:42+5:30

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील

Board of Directors of Raigad District Central Co-operative Bank elected unanimously | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांची बँकेच्या चेअरमनपदी सलग पाचव्यांदा निवड झाली.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून सुरेश खैरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी आ. जयंत पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश खैरे यांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केले.त्यात दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने चेअरमन पदासाठी आ. जयंत पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदासाठी सुरेश खैरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर ज्येष्ठ शेकाप नेते तथा जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे यांच्या हस्ते आ. जयंत पाटील, सुरेश खैरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आ. जयंत पाटील व सुरेश खैरे यांना शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या सुरु वातीच्या काळापासून ते बँकेच्या आजच्या देदीप्यमान कामगिरीची ओळख सर्वांना करून दिली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघर्षातून ताब्यात घेतली. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे हित सांभाळून प्रामाणिकपणे काम करून आज बँकेची उंची वाढविली आहे. बँकेच्या असंख्य ग्राहक वर्गाला याप्रसंगी धन्यवाद देत त्यांनी शेतकरी आणि मच्छीमारांची आर्थिक उंची वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्र म करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात शंभर गोडाऊन उभारण्याचा मानस असून लवकरच त्याची अंमलबजावणी करून जिल्हा बँक हायटेक करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, कृष्णा गिदी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, संचालक नृपाल पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रभाकर पाटील, अस्लम राऊत, गणेश मढवी, प्रवीण लाले, संतोष पाटील, राजेंद्र हजारे आदी पदाधिकारी, संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Board of Directors of Raigad District Central Co-operative Bank elected unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.