सेंट्रल पार्कला मेट्रो स्थानकाला लागले मुर्बी गावाचे बोर्ड
By वैभव गायकर | Published: November 18, 2023 01:04 PM2023-11-18T13:04:28+5:302023-11-18T13:04:56+5:30
सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले.
लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर,पनवेल: नवी मुंबईमेट्रोचे दि.17 रोजी लोकार्पण झाले.नागरिकांनी मोठ्या उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले.मात्र या मेट्रोच्या 11 स्थानकांपैकी एक असलेल्या सेंट्रल पार्कच्या नावाला मुर्बी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता.या स्थानकाला सिडको मुर्बी गावाचे नाव देण्यास सिडको टाळाटाळ करीत असल्याने मुर्बी ग्रामस्थांनी मुर्बी गावाचे बोर्ड या स्थानकाला लावले आहेत.
या स्थानकाला मुर्बी गावाचे नाव देण्यासाठी मुर्बी ग्रामस्थांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले होते.सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता.सिडकोने गावाजवळील सर्वच स्थानकांना गावांची नावे दिली आहेत.मग मुर्बी गावावर अन्याय का ? असा प्रश्न गाव कमिटीचे सदस्य,शिवसेना विभाग प्रमुख मनेश पाटील यान उपस्थित केला आहे.सिडको स्थानकाला मुर्बी गाव देण्यास दिरंगाई करीत असल्यानेच आम्ही स्वतः मुर्बी गावाचे बोर्ड या स्थानकाला लावून नामकरण केले आहे.सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले.