मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:48 AM2018-04-19T00:48:27+5:302018-04-19T00:48:27+5:30

पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण २० मेनंतर मासेमारी होड्या किनाºयावर साकारल्या जायच्या.

Boat bays due to lack of fish | मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी

मासळी मिळत नसल्याने बोटी किनारी

googlenewsNext

संजय करडे ।

मुरुड जंजिरा : कोकणला ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. सुमारे अडीच लाख कुटुंब पारंपरिक मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, एलईडीचे नवे तंत्र वापरून मासेमारी सुरू करण्यात आल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारण २० मेनंतर मासेमारी होड्या किनाºयावर साकारल्या जायच्या. मात्र, यंदा मासळीच मिळत नसल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच होड्या किनाºयाला लागल्या आहेत. याबाबत मच्छीमार बांधवांशी संपर्क साधला असता, खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. एलईडीमुळे मासळी जाळ्यात सापडत नसल्याने डिझेल व मजुरीचा खर्चसुद्धा निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.


सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी सांगितले की, मोठ्या होड्या खोल समुद्रात २० ते २५ दिवसांच्या आसपास मासेमारी करतात. अशा वेळी या होड्यांचा डिझेल व मजुरीवरील खर्च हा ७० हजारांच्या आसपास जातो; परंतु प्रत्यक्षात मासळी मात्र दहा हजारांचीही मिळत नाही. असे दोन-तीन वेळ झाल्यास होडीचा मालक आपोआप कर्जबाजारी होतो, खर्चसुद्धा निघत नसल्यानेच होड्या किनारी लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे मकू यांनी सांगितले.

३५० बोटी
मुरु ड तालुक्यात सुमारे ३५० बोटी कार्यरत असून याद्वारे समुद्रातून मासेमारी केली जाते. मोठ्या बोटींबरोबरच लहान बोटींची संख्याही अधिक आहे. पूर्वी मोठ्या होड्या किनाºयाला मे महिन्याच्या अखेरीला साकारल्या जात असत; परंतु खोल समुद्रात मासळी सापडत नसल्याने या होड्या एप्रिल महिन्यातच किनाºयाला लावण्याची नामुष्की मच्छीमारांवर आली आहे.
रायगड जिल्ह्यात एलईडी तंत्राचा वापर करून मासेमारी करणाºया नऊ बोटी पकडल्या आहेत. तसेच तहसीलदारांकडे केसही दाखल करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या बोटींचा परवाना रद्द करणे, दंड आकारण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कार्यालयाकडे पुरेशी यंत्र सामुग्री नसल्याने एलईडी बोटीवरील पकडलेला जनरेटर जप्त करण्यात आलेला नाही; परंतु एलईडी ब्लब ताब्यात घेण्यात आले आहेत.
- अविनाश नाखवा,
सहायक मत्सविकास आयुक्त

Web Title: Boat bays due to lack of fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.