सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनारी, महाकाय लाटांचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:14 AM2018-08-13T04:14:32+5:302018-08-13T04:14:45+5:30
३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत.
- संजय करडे
मुरु ड जंजिरा : १ जून ते ३१ जुलै मासेमारी करण्यास बंदी असल्यामुळे सर्व बोटी किनाºयावरच होत्या; परंतु १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. मात्र, ३ आॅगस्टपासून जोरदार वारे तेही ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने वाहू लागल्याने समुद्रात गेलेल्या बोटी पाण्यावर टिकावच धरू शकत नसल्याने पुन्हा किनारी परतल्या आहेत. आधीच दोन महिने मासेमारीबंदी आणि आता समुद्र खवळल्याने बोटी किनारी लागल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
मुरु ड तालुक्यातील मुरु ड शहर, एकदरा, आगरदांडा, दिघी या भागांची पाहणी केली असता, बहुसंख्य बोटी किनाºयाला लागल्या असून, वाºयाचा वेग कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार करीत आहेत. मुरु ड तालुक्यात छोट्या व मोठ्या बोटींची संख्या ६५० आहे, तर इतर बंदरातूनसुद्धा आलेल्या बोटी या आगरदांडा व दिघी बंदरात नांगरण्यात येतात.
खोल समुद्रात तशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने तातडीने जिथे किनारा जवळ असेल अशा ठिकाणी आम्ही बोटी लावल्या व स्वत:चे व बोटीचे संरक्षण केल्याचे कैलास कोटकर व संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले. वाºयाचा वेग जास्त असल्याने समुद्रात टाकलेले जाळे हे आपोआप गुंडाळले गेल्याने ते बोटीवर खेचताना खूप ताकद लावावी लागली. तर काही ठिकाणी जाळे खेचता येत नसल्याने अखेर कापावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचे मच्छीमार सांगतात.
सध्या आगरदांडा बंदरात हर्णे, मुरुड व रत्नागिरी येथील बोटी तर दिघी बंदरात डहाणू, सातपाटी, पालघर आदी ठिकाणच्या बोटी शाकारण्यात आल्या आहेत. यामुळे बंदरात बोटींची संख्या जास्त दिसून येत आहे. ३ आॅगस्टपासून वाहणारे जोरदार वारे अद्यापपर्यंत शांत झालेले नाहीत, त्यामुळे बोटी किनाºयावर आहेत. आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.
सिमेंट काँक्रीटचे बंधारेही तुटले
जोरदार वाºयांचा परिणाम किनारीभागालाही बसला आहे. मुरु ड समुद्रकिनारी असणारी सुरु ची बाग भरतीच्या लाटांमुळे, पाणी किनारी घुसल्याने उन्मळून पडली आहे.
जोरदार लाटांच्या धडकेमुळे सिमेंट काँक्र ीटचे बंधारेसुद्धा तुटले असून लहान जेटींचे नुकसान झाले आहे. दक्षिणेकडून येणाºया वाºयाचा वेग अधिक असल्याने बोटींचेही नुकसान होत आहे.
ताशी ६० कि.मी. वाहणाºया सुसाट वाºयामुळे होड्यांचे तसेच मासेमारीच्या जाळ्यांचेही नुकसान होत आहे. जाळी एकमेकांत गुंतत असल्याने समुद्रातच तोडून परतावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.