कुलाबा किल्ला परिसरातील बोट रोको आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:56 AM2020-01-03T00:56:53+5:302020-01-03T00:56:59+5:30
आज जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलकांबरोबर बैठक
अलिबाग : पर्ससीन आणि एलईडी फिशिंगला कायद्याने बंदी असतानाही काही बोटी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने मासेमारी करत आहेत. प्रशासन आणि सरकार याबाबत ठोस कारवाई करत नसल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी अलिबाग येथील कुलाबा किल्ला समुद्र परिसरामध्ये ३ जानेवारी रोजी करण्यात येणारे बोट आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पर्ससीन आणि एलईडी फिशिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत आहे. अशा मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील माशांच्या प्रजननावरही विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्यसंपदाच धोक्यात आलेली आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी पारंपरिक मासेमारी करणारे आणि एलईडी फिशिंग करणाºयांमध्ये भरसमुद्रामध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्याचप्रमाणे खांदेरी किल्ल्यावरही मोठ्या प्रमाणात वाद झाल्याने सुमारे सात जण जखमी झाले होते. याबाबतच्या दोन्ही तक्रारी विविध पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. सातत्याने असे वाद होत असल्याने पारंपरिक मासेमारी करणाºयांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, मत्स्य विकास अधिकारी यासह अन्य विभागाचे अधिकारी वेळीत हस्तक्षेप करत नसल्याने संघर्षामध्ये वाढ होत आहे. त्यांच्यावर किरकाळ कारवाई करण्यात येत असल्याने असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठीच बोट रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, जिल्हाधिकाºयांनी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी ३ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता बैठक बोलवली आहे. त्याबैठकीमध्ये पारंपरिक मासेमारी करणाºयांची बाजू मांडण्याची मला संधी मिळणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.
समुद्रात मासेमारी कोणी करावी, अथवा कोणी करू नये असा प्रश्नच नाही; परंतु मासेमारी कशा पद्धतीने करावी आणि कोठे करावी, यासाठी सरकारने काही कायदे, नियम बनवले आहेत. त्यांचे कोणी पालन करत नसेल तर आंदोलन करणे हाच पर्याय आमच्याकडे आहे; परंतु जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यातून नक्कीच मार्ग काढतील, असेही भोईर यांनी सांगितले.
दरम्यान, पारंपरिक मच्छीमारी करणाºयांची मागणी रास्त आहे, तसेच एलईडी आणि पर्ससीन मासेमारीला विरोध केल्याने हल्ले होत असल्याने भीतीसह दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याप्रश्नी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघर्षामध्ये वाढ
पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, मत्स्य विकास अधिकारी यासह अन्य विभागाचे अधिकारी वेळीत हस्तक्षेप करत नसल्याने संघर्षामध्ये वाढ होत आहे. याबाबत रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी नाराजी व्यक्त के ली आहे.