मुरुड : अवकाळी पाऊस व तद्नंतर वेगवेगळी वादळे यामुळे वाºयाचा वेग वाढला व ऐन हंगामात होड्या सागरीकिनाºयाला लागलेल्या. आॅगस्टपासून ते आजतागायत समुद्रात कधी वाºयाचे प्रमाण वाढले तर ढगाळ हवामानामुळे कोकण किनारपट्टीवरील समस्त कोळी समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. अनेक संकटांचा सामना करत मच्छीमारी करणारा कोळी समाज धैर्याने तोंड देत असून, ज्या वेळी परिस्थिती निवळत आहे तेव्हा ते मोठ्या आनंदाने खोल समुद्रात जाण्यास तयार होत आहेत.
७ डिसेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत चांदणी रात्र व प्रखर चंद्रप्रकाश पडत असल्यामुळे जाळ्यामध्ये मासे मिळत नाहीत. या दिवसात मासेमारीला जाऊनसुद्धा भरसमुद्रात चंद्राचा व ताऱ्यांचा प्रखर प्रकाश पडत असल्याने मासे जाळ्यात फसत नाहीत. त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या होड्या किनाºयावर परतल्या होत्या. १५ डिसेंबरपासून काळोख्या रात्रीस सुरुवात होईल व किनाºयाला आलेल्या होड्या पुन्हा समुद्रात जाण्यास सज्ज झाल्या आहेत. रविवार, १५ डिसेंबरपासून चंद्र व ताºयांचा प्रकाश ओसरणार असून, काळोख्या रात्रीची सुरुवात होणार आहे. मुरुड येथील एकदरा पुलाखाली असंख्य उभ्या असणाºया होड्यांची रेलचेल रविवारपासून सुरू झाली आहे. सहा सिलिंडरच्या असणाºया मोठ्या बोटीच्या डागडुजीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या बोटींवर खोल समुद्रात मासेमारी करीत असताना किमान आठ दिवस राहावे लागते, यासाठी मिळालेली मासळी ताजी व फ्रेश राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ भरण्यात येत आहे. महिनाभर पुरेल एवढे धान्य व अन्य बाबी बोटीवर भरण्यात मच्छीमार व्यस्त आहेत.मोठ्या बोटींची कामे पूर्ण; खलाशी झाले सज्जच्येणाºया एक अथवा दोन दिवसांत किनाºयाला आलेल्या सर्व मोठ्या बोटी मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातील, त्या वेळी सागरीकिनाºयावर एकही बोट दिसणार नाही.च्सर्व मोठ्या बोटींची कामे पूर्ण झाली असून, रविवारपासून खोल समुद्रात बोटी रवाना होण्यास सज्ज झाल्या आहेत. यासाठी बोटीवर बर्फ , रॉकेल, डिझेल अशा गोष्टी पूर्ण करण्यात येत असून खलाशांनी खोल समुद्रात जाण्यासाठी तयार होण्याचे आदेश बोटमालकांकडून देण्यात आले आहेत.च्समुद्रात काळोख पसरल्याने मासळी जाळ्यात अडकणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून विविध संकटांना सामोरे जाणारे मच्छीमार पुन्हा नव्या उमेदीने मासेमारी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संकटाचा काळ संपून मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन झालेले कर्ज फिटून धंद्यात फायदा मिळावा, हीच प्रार्थना समस्त कोळी समाज करत आहे.