बोगस मालकाने व्यवहारात उकळले १७ लाख

By admin | Published: January 18, 2016 02:11 AM2016-01-18T02:11:09+5:302016-01-18T02:11:09+5:30

तालुक्यातील शेलू रेल्वे स्टेशननजीक बांधीवली येथील एका जमीन मिळकतीचा आपणच मूळ मालक आहे असे भासवून बोगस मालकाने फसवणूक करून सुमारे १७

The bogus owner consumes 17 million | बोगस मालकाने व्यवहारात उकळले १७ लाख

बोगस मालकाने व्यवहारात उकळले १७ लाख

Next

कर्जत : तालुक्यातील शेलू रेल्वे स्टेशननजीक बांधीवली येथील एका जमीन मिळकतीचा आपणच मूळ मालक आहे असे भासवून बोगस मालकाने फसवणूक करून सुमारे १७ लाख रु पये उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस स्टेशनजवळच असलेल्या बांधीवली गावालगतची जमीन मिळकतीचा हेमंत कुलकर्णी याने मीच मूळ मालक आहे, असे दिनेश भानुशाली यांना सांगितले. त्या जमिनीची १ डिसेंबर २०१५ ते १४ जानेवारी २०१६ दरम्यान विक्र ी करून त्यांच्याकडून ७९ लाख रु पयांस व्यवहार ठरवून त्यापैकी १७ लाख रु पये आगावू रक्कम घेऊन दिनेश भानुशाली यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून नेरळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The bogus owner consumes 17 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.