बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:35 AM2018-07-05T02:35:45+5:302018-07-05T02:35:53+5:30

श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले.

 BorliPanchan Department in darkness; Mhasal fell eight eighteen pillars in Gonchar | बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले

बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले

Next

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. पावसाचा जोर व वादळी वारे यामुळे म्हसळा ते गोनघर रस्त्यावरील विद्युत महामंडळाचे २२ केव्ही उच्चदाब वाहिनीचे आठ खांब पडले आहेत. त्या कारणाने विद्युत महामंडळाच्या बोर्लीपंचतन विभागाअंतर्गत येणाऱ्या बोर्ली, दिवेआगर, वडवली, भावे, कुडकी, शिस्ते, कापोली, वेळास, आदगाव, सर्वा, हरवीत, कुडगाव, दिघी, नानवेल या गावांचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे. विद्युत महामंडळाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. सदर वादळात कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झालेली नाही.

वादळी पावसामुळे विद्युत महामंडळाचे जवळपास आठ खांब जमीनदोस्त झाले आहेत. उद्या सकाळी दुरुस्तीला सुरुवात केली जाईल. दोन दिवसात विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- महेंद्र वाकपंैजण, अभियंता,
विद्युत महामंडळ श्रीवर्धन

कालपासून पावसाचे प्रमाण जास्त आहे. आज गोनघरजवळ विद्युत महामंडळाचे खांब पडले त्या व्यतिरिक्त कुठे नुकसान झालेले नाही. नैसर्गिक आपत्ती प्रसंगी जनतेच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस प्रशासन संवेदनशील आहे.
- धर्मराज सोनके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोर्लीपंचतन

वादळी पावसाने विद्युत महामंडळाचे खांब पडले आहेत. त्यामुळे आमच्याकडील विद्युत पुरवठा बंद पडला आहे. विद्युत महामंडळाने लवकरात लवकर विद्युत पुरवठा पूर्ववत करावा. जीर्ण खांब अगोदरच काढले असते तर आज ही चांगले खांब वादळात पडले नसते. पावसाळा सुरू झाल्यापासून विजेचा सारखा लपंडाव चालू आहे.
- धवल तवसाळकर, ग्रामस्थ वेळास

Web Title:  BorliPanchan Department in darkness; Mhasal fell eight eighteen pillars in Gonchar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड