कर्जतमधील पूल धोकादायक !
By admin | Published: April 11, 2016 01:30 AM2016-04-11T01:30:14+5:302016-04-11T01:30:14+5:30
कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे
नेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक पूल धोकादायक अवस्थेत असून, पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही पुलांवरील रेलिंग गायब झाली आहे, तर काही पुलांवर अद्याप संरक्षक कठडेच नसल्याने अशा पुलांवर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु याकडे बांधकाम खाते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निमाण झाली
आहे.
कर्जत तालुक्यातील काही पूल हे सार्वजनिक बांधकाम खाते व काही पूल हे जिल्हा परिषद बांधकाम खात्याअंतर्गत येत आहेत. परंतु या पुलाकडे ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष ना जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे लक्ष. त्यामुळे पुलांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील पोशीर नदीवरील माले पूल, साळोख, वारे -कुरु ंग रस्त्यावरील पूल, दहीवली पूल, मिरचोली पूल, मोहिली पूल, तलवडे पूल अशा अनेक पुलांवरील संरक्षक कठडे व रेलिंग गायब आहेत. तर अनेक छोट्यामोठ्या पुलांवर संरक्षक अद्याप बसविण्यात आले नाहीत. तसेच पुलावरील रस्तेही खराब झाल्याने अशा पुलांवरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
या पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा रस्त्यांची डागडुजी केली जाते, परंतु पुलांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
लवकरात लवकर असे नादुरु स्त पूल दुरु स्त करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
>कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरील तुटलेल्या रेलिंगच्या संदर्भात दुरु स्ती प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाली की पुलाच्या रेलिंगची दुरु स्ती करण्यात येईल व अन्य नादुरु स्त पुलांचीही पाहणी करण्यात येईल.
- एस. एम. कांबळे
उप अभियंता, सा. बां. विभाग, कर्जत