मंकी हिलजवळ दरड कोसळली, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:21 AM2019-06-26T00:21:00+5:302019-06-26T00:25:22+5:30
लोणावळ्याजवळील मंकी हिल येथे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कर्जत - लोणावळ्याजवळील मंकी हिल येथे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज रात्रीच्या सुमारास मंकी हिल जवळील दरडीचे दगड कोसळून ट्रॅकवर पडले. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.
Sunil Udasi, Chief Public Relations Office, Central Railways: Boulders have fallen on railway track between Karjat and Lonavala near Monkey Hill. Operations to remove the boulders is going on. Middle through line is closed. #Maharashtrapic.twitter.com/t52Xr067Ca
— ANI (@ANI) June 25, 2019