मुलानेच केली आईची गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:05 AM2018-08-06T05:05:22+5:302018-08-06T05:05:32+5:30

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर व तालुक्यातील कावीर येथील रहिवासी अन्वेय नाईक याने ५ मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

The boy did the same thing by killing his mother | मुलानेच केली आईची गळा दाबून हत्या

मुलानेच केली आईची गळा दाबून हत्या

अलिबाग : मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर व तालुक्यातील कावीर येथील रहिवासी अन्वेय नाईक याने ५ मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धसका घेऊन वयोवृद्ध आईचा मृत्यू झाल्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली होती. मात्र, मुलानेच आपल्या आईला गळा दाबून मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात मयत मुलगा अन्वेय नाईक याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्वेय मधुकर नाईक (५३) याने आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या करून आई कुमुद मधुकर नाईक (७३) हिचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले.
अन्वेय नाईक याने आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली
होती. तर अन्वेय नाईक याची आई
ही त्याच्या व्यवसायात भागीदार
होती.
आईचा मृत्यू मुलाच्या मृत्यूने धसका घेऊन झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तापसांती व डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार आईचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे समोर आले आहे. अन्वेय यानेच आई कुमुद नाईक हिचा गळा दाबून खून केला व त्यानंतर स्वत: आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: The boy did the same thing by killing his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.