शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लग्न करताना मुला-मुलींची तपासणी गरजेची

By admin | Published: February 19, 2017 3:53 AM

मुलांचे लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा मुला-मुलींची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे. शरीरातील लोहाचे प्रमाण

नागोठणे : मुलांचे लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा मुला-मुलींची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे. शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले, तर अ‍ॅनिमिया रोग होतो व त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड करणे, थकवा जाणविणे, अभ्यासात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे या सारखे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे थॅलसेमिया हा अनुवंशिक आजार आहे. या आजारावर वेळीच औषधोपचार केल्यास बरा होऊ शकतो. त्याचबरोबर मुलांनी घ्यावयाचा आहार, याची माहिती देऊन पालकांनीही मुला-मुलींची लग्न करताना जन्मकुंडली किंवा पत्रिका बघण्यापेक्षा त्यांची शारीरिक क्षमता, तसेच विविध रोगांची तपासणी करणे गरजेचे आहे, असे डॉ. मिलिंद भिडे यांनी या वेळी सांगितले. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन आॅफ रायगड, भिडे लॅबोरेटरी सर्व्हिसेस मुंबई आणि नागोठणे मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील कार्ली येथील पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘रान पाखरं’ या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅनिमिया व थॅलसेमिया निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी भिडे बोलत होते. विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी व्हावी, या डॉ. अनिल गीते यांच्या संकल्पनेने ‘रान पाखरं’ आदिवासी आश्रमशाळेतील पाचवी ते दहावीच्या १५९ विद्यार्थिनींचे अ‍ॅनिमिया व थॅलसेमिया तपासणीचे निदान शिबिरामध्ये करण्यात आले व दोष असलेल्या विद्यार्थिनींना मोफत औषधे देण्यात आली. डॉ. शेळके यांनी विद्यार्थ्यांमध्ये वयोमानानुसार होणाऱ्या नैसर्गिक बदलाची, तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या वेळी ट्रान्ससिया कंपनीचे सी.एस.ई. अतुल भिडे, नागोठणे मेडिकल असोसिएशनचे डॉ. रोहिदास शेळके, डॉ. नरेश सोष्टे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (वार्ताहर)