शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

ब्रेकिंग: मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 5:51 PM

हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली,पायलटचे प्रसंगवधानाने अनर्थ टळला

आविष्कार देसाई

अलिबाग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.

हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाPoliceपोलिसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019