कर्जत : फ्लॅटची घरपट्टी कमी करतो, त्या मोबदल्यात आम्हाला पैसे दे, अशी मागणी करणाºया कर्जत नगरपरिषदेच्या कर विभागाच्या दोन कर्मचाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाने ही कारवाई केली आहे.कर्जत नगरपरिषद हद्दीत दहीवली येथील चैतन्य अपार्टमेंटमध्ये अमीर शेख यांचा फ्लॅट होता. हा फ्लॅट हेमंत देशमुख यांनी विकत घेतला. त्या फ्लॅटच्या घरपट्टीबाबत देशमुख यांचा मित्र जयेश ठाकरे नगरपरिषदमध्ये चौकशी करायला गेला. तेव्हा कर विभागाने त्याला फ्लॅटची ३१ मार्च २०१९ पर्यंतची घरपट्टी ५२ हजार ७३२ रु पये सांगितली. मात्र, काही दिवसांत कार्यालयातून नगरपरिषदची घरपट्टी आली ती प्रत्यक्षात २७ हजार ६६७ रुपये होती. तेव्हा जयेश ठाकरे यांनी करविभागाकडे चौकशी करून २५ हजार रु पयांचा फरक कसा, अशी विचारणा केली.२५ हजाराचा फरक दिसत होता, त्यावर तडजोड म्हणून या रकमेच्या अर्धी रक्कम आम्हाला दे आणि सहा हजार रु पये ट्रान्सफर फी दे, अशी मागणी त्या कर्मचाºयांनी ठाकरे यांच्याकडे केली. साडेतीन महिने फेºया मारून कंटाळलेल्या ठाकरे यांनी पैसे द्यायचे ठरवले. मात्र, त्यांनी या बाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास १३ हजार ५०० रु पयांची लाच स्वीकारताना कर्जत नगरपरिषदेच्या कर विभागाचे रमेश लाड व दिलीप उर्फ डी. के. गायकवाड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
लाचखोर कर्मचाऱ्यांना कर्जतमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:55 AM