तात्पुरती सोय म्हणून लोखंडी पट्टीचा पूल केला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:31 AM2018-07-15T02:31:16+5:302018-07-15T02:31:19+5:30
संजय गायकवाड
कर्जत : नेरळ धरणाच्या खाली असलेला लहान पूल मार्च महिन्यात वाहून गेला होता, त्या पुलासाठी रायगड जिल्हा परिषदेने निधी देण्याचे मंजूर केले होते. मात्र, निधी न मिळाल्याने तात्पुरती सोय म्हणून लोखंडी पट्टीचा पूल तयार करण्यात आला आहे. मात्र, हा पूल वाहतुकीस सुरक्षित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नेरळ ग्रामपंचायतच्या मागील भागात काही आदिवासी वाड्या आणि एक मोठी वस्ती आहे. त्यांना जाण्यासाठी ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली एक कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता. मात्र, त्या पुलावरून सातत्याने अवजड वाहतूक होत राहिल्याने पूल २७ मार्च रोजी कोसळला. पूल तुटल्याने परिसरातील ग्रामस्थांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागे, त्यामुळे लवकरात लवकर पुलाची निर्मिती व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती.
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने तेथे कमी रुं दीचा एक पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा लोखंडी पूल असून किती काळ टिकेल, हेही सांगता येत नाही. तात्पुरती सोय म्हणून हा पूल उभारण्यात आला असला तरी यावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. पुलावरून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची नियमित वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना होणेही गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे
आहे.
दुसरीकडे तेथे नवीन पुलाची निर्मिती करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने २२ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मात्र, त्या अंदाजपत्रकाचे काय झाले? हादेखील प्रश्न आहे.
तात्पुरती सोय या नावाखाली नेरळ सारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतीने लोखंडी प्लेट टाकून पूल बनवल्या प्रकरणी खुद्द ग्रामपंचायत उपसरपंच अंकुश शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांची पूल बनवायची जबाबदारी होती, त्यांनी वेळकाढू धोरणाचा अवलंब केल्याने ग्रामस्थांना लोखंडी प्लेटवरून नाला पार करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ा पुलाला लोखंडी पट्टीची मात्रा