वाहून गेलेला पुल केवळ बारा तासात पुन्हा उभारला, आपत्ती व्यवस्थापनाचा आगळा वस्तूपाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 06:13 PM2018-06-26T18:13:24+5:302018-06-26T18:17:09+5:30
नैसर्गिक आपत्ती केव्हा, कशी,कुठे आणि कुणावर येईल हे काही सांगता येत नाही परंतू ती आल्यावर तिचा मुकाबला शासकीय यंत्रणांकडून नेमका कसा केला जावू शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीचे निवारण कमीतकमी कालावधीत करता येवू शकते याचा आगळा वस्तूपाठ
जयंत धुळप
खोपोली - नैसर्गिक आपत्ती केव्हा, कशी,कुठे आणि कुणावर येईल हे काही सांगता येत नाही परंतू ती आल्यावर तिचा मुकाबला शासकीय यंत्रणांकडून नेमका कसा केला जावू शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीचे निवारण कमीतकमी कालावधीत करता येवू शकते याचा आगळा वस्तूपाठ, सोमवारी दूपारी खोपोली-पाली मार्गावरील छोटा पूल अतिवृष्टीने वाहून गेल्यावर तो रातोरात काम करुन केवळ बारातासात पून्हा उभारुन वाहतूक पूर्ववत करुन रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आणि संबंधीत शासकीय यंत्रण यांच्या अनोख्या समन्वयातून घालून दिला आहे. या मार्गावरुन मंगऴवारी प्रवास करणारा प्रत्येक जण प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतूक करित आहे.
वाहतूक तत्काळ थांबविल्याने कोणताही वाहन अपघात नाही
रविवारी रात्नी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाली - खोपोली रस्त्यावरील खुरावले फाट्याजवळील छोटा पूल सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वाहुन गेला. परिणामी या मार्गावर मोठी गंभीर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. सर्व प्रथम येथील दोन्ही बाजू कडील वाहतूक तत्काळ थांबविणो अनिवार्य असल्याचे गांभीर्याने विचारात घेवून पालीचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी वाहतूक बंद केली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी जड वाहने वाकण फाट्यावरु न पेण मार्गे वळविली.तर लहान वाहनांची रहदारी उद्धर मार्गे वळविण्यात आली. परिणामी पूल वाहून गेल्यावर कोणत्याही प्रकारचा वाहन अपघात वा अनूचित प्रकार घडला नाही.
तहसिलदार बी.एन. निंबाळकर तत्काळ पोहोचले घटनास्थळी
जिल्ह्यात नुकताच केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग निर्माण मंत्नालयाने वाकण- पाली-खोपोली हा रस्ता एनएच 548-अ राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी खुरावले फाट्याजवळ रस्त्याच्या निम्म्याभागाचे काम सुरु होते व जुन्या निम्म्या भागावरु न रहदारी सुरु होती. या ठिकाणी असलेला छोटा पूल (पाईप मोरी)संततधार पावसामुळे आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहुन गेली. त्यावेळी पालीचे तहसिलदार बी.एन. निंबाळकर पदविधर निवडणू मतदान प्रक्रीयेत व्यस्त होते. परंतू परिस्थितीचे गांभिर्य ओळखून ते लगेचच घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना देण्यात आली.
सर्व यंत्रणांशी केवळ 3क् मिनिटांत समन्वय साधण्यात यश
लगेचच रायगड पोलीस, महसूल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या सर्वाचा समन्वय केवळ 3क् मिनिटांत साधण्यात आला. घटनास्थळी तहसिलदार निंबाळकर यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, उपअभियंता सचिन निफाडे, पालीचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी पोहोचले.
पुल वाहून गेल्यावर पूढील दिड तासात नव्या पूलाच्या उभारणीचे काम सुरु
तत्काळ दोन हायड्रा मशिन्स , दोन जेसीबी आणि दोन पोकलॅन्ड मशिन्स पाचारण करु न सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नव्या पूलाच्या उबारणीस सुरु वात करण्यात आली. पूलाचे जूने पाईप 60 मिमि चे होते. ते हटवून त्या ठिकाणी 120 मिमी चे सिमेंट पाईप टाकणो आवश्यक होते. तेथून जवळच जांभुळपाडा येथे याच रस्त्याच्या कामाचा डेपो होता तेथून तातडीने पाईप आणले. रस्त्याचा भराव मोकळा करु न पाईप टाकण्यासाठी जागा तयार करु न पाईप टाकण्यात आले. त्यानंतर हा तब्बल 14 मीटर रुंद, 5 मीटर लांब असलेल्या खड्ड्यात भराव टाकण्याचे काम सुरु झाले. तब्बल 50 क्युबिक मिटर्सचा खडीचा भराव करुन व रस्त्याचे सपाटीकरण करु न खडीचा रस्ता तयार करण्यात आला. यासाठी 10 ते 15 डंपर सातत्याने खडीची वाहतुक करीत होते. या दरम्यान सतत पाऊस सुरु च होताच. त्या परिस्थितीतही न थांबता अव्याहतपणो हे काम सुरु होते. मध्यरात्री पाऊण वाजता या रस्त्याचे काम पूर्ण करु न त्यावरु न रहदारी पुर्ववत करण्यात सर्व यंत्रणांना यश आले.
रस्त्यावरु न रहदारी पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. अवजड वाहतूक मात्न अद्याप सुरु केलेली नाही. अर्थात ही तात्पुरती व्यवस्था आहे, पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या निम्म्या भागाचे कॉक्र ीटीकरण पुर्ण झाल्यावर त्यावरु न रहदारी वळवून उर्विरत भागाचे काम पुन्हा करण्यात येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता सचिन निफाडे यांनी दिली आहे