पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची गरज, दासगाव खिंड धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:53 AM2018-05-09T06:53:58+5:302018-05-09T06:53:58+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये...
- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना होऊ नये, यासाठी राष्टÑीय महामार्ग वाहतूक पोलीस शाखा, महाड यांनी इंदापूर ते पोलादपूर या ५७ किमी मार्गाच्या हद्दीतील सर्व पूल, मोºया यांचे स्ट्रक्चरल आॅडिट होण्याची मागणी केली आहे. महामार्ग वाहतुकीस योग्य आहे की कसे, त्याचबरोबर धोकादायक स्थितीत असलेल्या ठिकाणचा अहवाल, प्रकल्प अधिकारी एन. एच. ए. आय. चिंचपाडा कळंबोली, उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टÑीय महामार्ग विभाग तसेच चौपदरीकरणाचे काम घेणारी एल. अँड टी. कंपनी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबरच महामार्गावर असलेली दासगाव खिंड ही धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढत, याची खबरदारी घेण्याची सूचनाही यावेळी केल्या आहेत.
कोकणात पावसाचा जोर नेहमीच अधिक असतो. २०१६ मध्ये महाड तालुका हद्दीत सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येतात. मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग त्यावेळी गजबजलेला असतो. मात्र खड्ड्यांचा त्रास, ठिकठिकाणी होणाºया वाहनांना अडचणी, वाहतूककोंडी, छोटे-मोठे अपघात तर सध्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका बसू नये, कोणतीही जीवित हानी अगर वित्त हानी होऊ नये याचा विचार करून राष्टÑीय महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र महाड यांनी आपल्या इंदापूर ते पोलादपूर ५७ किमीच्या हद्दीतील सर्व पूल आणि छोट्या-मोठ्या मोºयांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे तसेच हा महामार्ग वाहतुकीस योग्य आहे की कसे याच्या अहवालाची प्रकल्प अधिकारी महामार्ग विभाग एन. एच. ए. आय. चिंचपाडा कळंबोली यांना जा. क्र. ५३/२०१८चा २३/०४/१८च्या पत्राने मागणी केली आहे.
स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ५७ किमी अंतरामध्ये येणारे माणगाव, काळ नदीवरील पूल, लोणेरे पूल, महाडमधील गांधारपाले पूल तसेच या हद्दीमधील येणारे सर्वच छोट्या-मोठ्या मोºया यांचे बारकाईने स्ट्रक्चरल आॅडिट होण्याची मागणी करत अहवाल मागितला आहे.
महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल दुर्घटना नजरेसमोर ठेवत यासारख्या दुर्घटना पुन्हा पुन्हा होऊ नये, यासाठी महाडमधील महामार्ग वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक राष्टÑीय महामार्ग बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करत दासगाव खिंड धोकादायक स्थितीत आहे.
दरडग्रस्त विभाग असल्याने या विभागात दरडीचा धोका उद्भवू शकतो. कारण खिंडीच्या दोन्ही बाजूने डोंगर भाग आहे. यंदाच्या पावसाळ्यात डोंगर कोसळून महामार्गाला धोका असल्याचा स्पष्ट पत्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या ठिकाणचा धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून दोन्ही बाजूने लोखंडी जाळी मारण्याचा सल्ला दिला आहे. तर इंदापूर ते पोलादपूर दरम्यान माणगाव, लोणेरे, गांधारपाले, नडगाव, पोलादपूर येथे असलेले पूल तसेच सर्व मोºयांचे निरीक्षण करून अहवाल मागितला असून ठिकठिकाणी तुटलेल्या मोºयांवरचे कठडे दुरुस्त करणे, पार्लेवाडी येथील स्मशानाजवळील मोरी मोडकळीस आल्याने त्यावरील कठडा तुटला असून त्या ठिकाणी अपघात वाढले असल्याने त्या ठिकाणची दुरुस्ती करणे, रस्त्यावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, रस्त्यालगतचे वाढलेले गवत काढण्याच्या सूचना करत याचा अहवाल देखील मागितला
आहे.
सध्या चौपदरीकरणाचे काम करत असलेली एल अँड टी कंपनीला देखील अशा प्रकारे पत्र देवून खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे.
५७ किमीमध्ये ६ ठिकाणी रस्ते वाहतुकीला धोका
१मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला तेजीत सुरुवात झाली असली तरी पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणचे वळणावरचे डोंगर खोदकाम अर्धवटच राहणार आहे. मात्र याचा फटका वाहतुकीला नक्कीच बसणार आहे.
२दासगाव खिंड धोक्यात असून त्याच्या बाजूला डोंगर भागात अर्धवट खोदकाम झाले आहे. दासगाव वहूर गाव हद्दीत मधल्या वळणावर तीच अवस्था आहे. केंबुर्ली वाकणात तर उभ्या डोंगरालाच खोदकाम झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे साहिलनगर येथे वाकण व शेडाव नडगावजवळील डोंगराचे खोदकाम अशा ६ ठिकाणी डोंगर खोदकामामुळे पावसाळ्यात माती रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३सध्या हे काम एल अँड टी कंपनीकडून होत आहे. या ठिकाणी महामार्गालगतची गटारे देखील बुजली गेली आहेत. डोंगर भागातून येणारे पाणी सरळ सरळ रस्त्यावरच येणार आहे. यामुळे मुंबई - गोवा महामार्ग यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या अडचणीत आल्याचे चिन्ह दिसून आले आहे. तरी एल अँड टी कंपनी किंवा महामार्ग बांधकाम विभाग काय खबरदारीची पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरवर्षी होणाºया महामार्गावरील अपघाताची पडताळणी करत यंदा गणेशोत्सव व इतर वेळी देखील कोकणवासीय प्रवाशांना प्रवासामध्ये कोणताच त्रास होऊ नये, प्रवास सुखरूप व्हावा यासाठी हे पाऊल राष्टÑीय महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र यांनी उचलले आहे.यासाठी आमच्या अखत्यारीतील ५७किमी मार्गाची पाहणीही करण्यात आली आहे.
- दत्तात्रेय गाढवे, पोलीस निरीक्षक, महाड वाहतूक