भावाचा विजय बहीण पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:51 AM2018-05-29T01:51:49+5:302018-05-29T01:51:49+5:30

मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नौशाद दळवी यांनी आपली सख्खी बहीण अस्मिता चुनेकर यांचा १४५ मतांनी पराभव करून थेट सरपंचपद पटकावले आहे.

Brother's victory loses sister | भावाचा विजय बहीण पराभूत

भावाचा विजय बहीण पराभूत

Next

बोर्ली मांडला : मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नौशाद दळवी यांनी आपली सख्खी बहीण अस्मिता चुनेकर यांचा १४५ मतांनी पराभव करून थेट सरपंचपद पटकावले आहे.
या ग्रामपंचायतीत ७१.२0 टक्के मतदान झाले होते. चार प्रभागातील ३८४५ मतदानापैकी २३७८ मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान चार क्र मांक प्रभागामध्ये ७२0 तर सर्वात कमी मतदान दोन नंबर प्रभागामध्ये ३५७ झाले होते.
सदस्यांच्या मतमोजणीत शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग एक मधील सचिन जंगम, वैशाली वाघमारे, प्रणिती कोपरदर, प्रभाग दोनमध्ये लता वाघमारे, प्रभाग तीनमध्ये चेतन जावसेन, प्रभाग चारमध्ये संगीता वाघमारे, माजी सरपंच भारती बंदरी, मतीन सौदागर, तर शिवसेनेचे प्रभाग तीनमध्ये जगीता कोटकर, नम्रता शिंदे हे निवडून आले आहेत. भाजपाचे नाराज गणेश कट यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून शिवसेनेच्या पाठिंब्याने १८0 मते मिळवून विजयश्री खेचून आणली.
शेतकरी कामगार पक्षाने एकाच आदिवासी कुटुंबातील वडील, आई आणि मुलगी या तिघांना तीन प्रभागातून उमेदवारी दिली होती. यातील वडील किसन वाघमारे यांचा पराभव सेनेच्या उमेदवार जगीता कोटकर यांनी केला तर मुलगी वैशाली वाघमारे यांनी सेनेच्या गुलाब वाघमारे यांचा पराभव केला, किसन वाघमारे यांची पत्नी लता वाघमारे यांनी सेनेच्या शर्मिला वाघमारे यांचा पराभव केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे मुरुड तालुका अध्यक्ष जयवंत
अंबाजी यांना १५७ मते, अपक्ष उमेदवार तेजल कानगोजे यांना १0२ मते मिळाली. नोटा मते यांचा
प्रभाव या निवडणुकीत दिसून आला आहे.

Web Title: Brother's victory loses sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.