अलिबाग : रायगड जिल्ह्यात बीएसएनएलची सेवा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे बँका, टपाल कार्यालयांतील आर्थिक व्यवहारांवर त्याचे परिणाम होत आहेत. गेले चार दिवस काही तास इंटरनेट बंद पडल्याच्या घटना घडल्या.या वाढत्या प्रकारामुळे बीएसएनएल कंपनीची आॅप्टिकल फायबर केबल तोडणाऱ्या यंत्रणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.दरम्यान, सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये इंटरनेट सेवा बंद पडल्याने व्यत्यय आला.जिल्ह्णातील ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्याने शासकीय व खासगी आॅनलाइन सेवा, सर्व बँकांचे आॅनलाइन कामकाज त्यामुळे बंद पडून आर्थिक व्यवहारांवर मोठा विपरित परिणाम होतो. त्याच बरोबरच सर्व नागरिक आॅनलाइन सेवेस वंचित राहतात, यास आळा घालण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.सरकारी वा खासगी अशा कोणत्याही यंत्रणेने वा कंपनीने खोदकाम करण्यापूर्वी बीएसएनएल कंपनीस लेखी कळवून, संबंधित खोदकामाच्या ठिकाणी जर बीएसएनएलची आॅप्टिकल फायबर केबल असेल तर बीएसएनएलचे अभियंते वा कर्मचारी यांच्या उपस्थितीतच खोदकाम करणे अनिवार्य आहे.परंतु अनेकदा याबाबत कळवले जात नाही. त्यामुळे खोदकाम केले जाते आणि त्यावेळी बीएसएनएलची आॅप्टिकल फायबर केबल तुटते, असे प्रसंग दरमहा किमान बारा ते पंधरा वेळेला अनुभवास येत असल्याची माहिती बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने दिली आहे.पूर्वसूचना देऊनही बीएसएनएलचे अभियंता वा कर्मचारी खोदकामाच्या ठिकाणी येत नाहीत. परिणामी काम नियोजित वेळेत पूर्ण करणे अशक्य होते, अशी परिस्थिती या निमित्ताने गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणाºया कंत्राटदारांच्या अभियंत्यांनी सांगितली आहे.
निवडणुकीदरम्यान अडचणी२३ एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेचे काम सुरू असताना अनेकदा इंटरनेट सेवा ठप्प झाली. त्यामुळे वेबकास्टिंगद्वारे संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जाणाºया बीएसएनएल ओएफसी केबलच्या ठिकाणी खोदकाम करू नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग विभागास दिले होते. तरीही खोदकाम झाल्याने त्याचा परिणाम निवडणूकीच्या कामांवर झाला.