पाली शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:34 AM2020-02-16T00:34:46+5:302020-02-16T00:34:55+5:30

नागरिक संतप्त । पाली पोस्ट कार्यालयातील काम ठप्प, खातेदारांची गैरसोय

BSNL's Internet service in Pali city collapses | पाली शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

पाली शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

Next

विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुक्यातील पाली शहरात असलेल्या बीएसएनएलच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पाली पोस्ट कार्यालयातील कामकाज मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना सतत फेºया माराव्या लागत असल्याने खातेधारकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.
पोस्टात ज्येष्ठ नागरिक आपले महिन्याचे व्याज घेण्यासाठी येत असतात. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर पत्रे पाठविण्यासाठी, टेलिफोन बिले भरण्यासाठी, पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा विमा भरण्यासाठीही लोक येतात. या सर्व सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सर्वच उप-टपाल कार्यालयात (सब पोस्ट आॅफिस) अपुरा कर्मचारी वर्ग व संथगतीने चालणाºया इंटरनेटमुळे गेले महिनाभर नागरिकांची कामे खोळंबली आहेत. यामुळे पोस्टात येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. पोस्ट आॅफिस कार्यालयांमध्ये कर्मचारी वाढवावेत, यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अगोदर पोस्ट आॅफिसमध्ये ‘संचय पोस्ट’ हे कम्प्युटर सॉफ्टवेअर सुरू होते. मात्र, त्यानंतर कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली असून, नवीन सॉफ्टवेअरवर पोस्ट कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. इंटरनेटवर सर्व माहिती टाकून वापर सुरू झाल्याने समस्या निर्माण झाल्याचे पोस्ट कर्मचाºयानी सांगितले. बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन येथे आहे. हे नेट अनेकदा संथगतीने चालते, तर बहुतांश वेळा नेट बंद झाल्याने पूर्णपणे कामे खोळंबतात. कोअर बँकिंगचे पिनॅकल हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे.
नवीन सॉफ्टवेअर व कमी मनुष्यबळामुळे समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. बीएसएनएलचे नेट सतत बंद पडत असेल, तर पोस्ट विभागाने पर्यायी खासगी नेट घ्यायला हवे. गैरसोय का करता, ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
1गेल्या अनेक दिवसांपासून आमचे व्याजाचे पैसे मिळत नाहीत व इतर आर्थिक व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. नेट बंद आहे असे उत्तर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला व्याजाचे पैसे घ्यायला पोस्टात जावे लागते. वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ज्येष्ठांच्या महिन्याचे वेळापत्रक कोलमडून जाते. अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक दुसºया व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पोस्टात पाठवतात. मात्र, अशा गोंधळामुळे ज्येष्ठांना वेळेवर पेसे मिळत नाहीत, असे खातेदारांनी सांगितले. पोस्टाच्या या गोंधळामुळे खातेदारांची सहनशीलता संपली आहे. आता आंदोलन करण्याचा इशारा काहींनी दिला आहे.
स्पीड पोस्ट जाणे बंद
2स्पीड पोस्ट वेळेत जाणे आवश्यक आहे. मात्र, पोस्ट आॅफिसमध्ये कम्प्युटर बंद असल्याने स्पीड पोस्ट जाणेही बंद आहेत. वीजपुरवठा खंडित झाला की, पोस्टातील कामावर परिणाम होतो. इंटरनेट व कम्प्युटरवर जी कामे अवलंबून आहेत ती सर्व कामे बंद होतात. पोस्टाचे एजंटही या सर्वप्रकाराला कंटाळले आहेत. एजंटकडे जमा झालेले खातेधारकांचे लाखो रुपयांचे चेक पोस्टात जमा होऊ शकलेले नाहीत. नवीन खाती उघडली जात नाहीत. पोस्ट कार्यालयात दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

माझी आई खूप आजारी आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात घेऊन जायचे आहे, त्याकरिता मी माझे पोस्टातील खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पाली पोस्ट कार्यालयात फेºया मारत आहे. मात्र, तेथील अधिकारी नेट नसल्याचे कारण सांगत आम्हाला परत पाठवीत आहेत. स्वकष्टाचे पैसे असूनही उपचारासाठी मिळत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.
- शीला गायकवाड, नाडसूर

जानेवारी महिन्यापासून पाली पोस्ट आॅफिसमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी संथगतीने सुरू असते तर कधी कधी पूर्णत: बंद. अनेकदा त्यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पर्यायी नेटवर्क वापरतो त्याचा राउटर खराब झाला आहे. त्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असून लवकरच व्यवस्था होईल.
- एम. पी. कोनकर, उप डाकपाल, पाली कार्यालय

गेले महिनाभर पाली पोस्ट आॅफिसमध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत असल्याने ग्राहकांना रोज फेºया माराव्या लागत आहेत. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ज्या दिवशी नेटवर्किंग बंद असेल, त्या दिवशी आॅफ लाइन कामकाज करून जुन्या पद्धतीने स्लीपवर व्यवहार करण्यात यावा, अशी मागणी ग्राहकांची आहे.
- किरण राऊत, शिवसैनिक

Web Title: BSNL's Internet service in Pali city collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.