बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:06 AM2018-03-15T03:06:13+5:302018-03-15T03:06:13+5:30

सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे.

B.Tech. Threshold leakage | बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

Next

- विनोद भोईर 
पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधा-यातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे यावर्षी सुधागडवासीयांवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याचे चित्र दिसते. या के.टी. बंधाºयाचे काही महिन्यापूर्वी दुरुस्तीकाम करण्यात आले होते. दुरु स्ती करूनही या बंधाºयातून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. जर असेच पाणी वाया जात राहिले तर एप्रिल व मे महिन्यात रासळ, अंबोले, पाली, कुंभारशेत खवली या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
या बंधाºयाची दुरवस्था झाली असून या बंधाºयाचे स्लॅब जागोजागी पडले आहे. काही ठिकाणी स्लॅब पडल्याने लाकडी फळी टाकण्यात आली आहे. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. या बंधाºयाच्या पाण्यावर रासळ, अंबोले, पाली येथील मोठमोठ्या पाण्याच्या योजना या के.टी.बंधाºयावर अवलंबून आहेत. अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहे. या बंधाºयाच्या पाण्याचा सुधागडातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना उपयोग होतो. त्यामुळे या बंधाºयातून होणारी पाणीगळती तातडीने थांबली पाहिजे अशीही मागणी होत आहे. या बंधाºयाचा फायदा प्रामुख्याने रासळ, अंबोले, कुंभारशेत पाली आदी गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी होतो. अंबा नदीच्या पात्रात बलाप येथे असणाºया पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयाची दुरु स्ती के ली मात्र पुन्हा पाणीगळती होत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.
>बलाप येथील के.टी.बंधाºयातून शेकडो लिटर दररोज गळती होत आहे. या बंधाºयाची काही महिन्यापूर्वी दुरु स्ती केली होती. मात्र पुन्हा गळती होत असल्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- पी.सी.पालकर, भाजपा, पाली शहराध्यक्ष
ंआम्ही कुंभारशेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कोलाड येथील कार्यालयाला बलाप येथील के.टी बंधाºयातून होणारी पाणी गळती थांबविण्याबाबत लेखी पत्र दिले आहे.
- राजेंद्र खिरवले, उपसरपंच, कुंभारशेत ग्रामपंचायत

Web Title: B.Tech. Threshold leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.