कर्जतमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:45 AM2020-03-03T00:45:43+5:302020-03-03T00:45:45+5:30

एका बांधकाम व्यावसायिकाच्या चार सदनिका परस्पर विकल्याने मोठी फसवणूक झाली आहे.

Builder's fraud in Karjat | कर्जतमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

कर्जतमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

googlenewsNext

कर्जत : तालुक्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या चार सदनिका परस्पर विकल्याने मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे सध्या कर्जतमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये देणारे-घेणारे हे दोघेही बोगस असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तो व्यवहार रद्द करण्यात आला. यामध्ये फायनान्स कंपन्यांचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे.
कर्जतमधील दहिवली परिसरात विलास थोरवे या बांधकाम व्यावसायिकाने ‘वैभव अपार्टमेंट’ ही इमारत बांधली आहे. या इमारतीमधील काही सदनिका बोगस कागदपत्रे जमा करून त्यांच्या जागी खोटी व्यक्ती उभी करून बोगस खरेदीदारांना विकल्या आहेत. याबाबत सुमारे एक वर्षापूर्वी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. यामध्ये काही फायनान्स कंपन्याही सामील आहेत. विलास थोरवे यांनी आपली झालेली फसवणूक लक्षात घेऊन यापुढे कर्जत तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीसंदर्भात सविस्तर माहिती देऊन सांगितले. त्याप्रसंगी सदनिकांचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या देणाºया आणि घेणाºया व्यक्ती बोगस असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक विलास थोरवे यांनी तीव्र शब्दांत केला.
रविवारी सकाळी ११ वाजता मार्केटयार्ड येथे बैठक आयोजित करून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीसाठी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक ओसवाल, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील, गजानन देशमुख, आदित्य हिंगमिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१४ मध्ये कर्जत दहिवली परिसरात प्लॉट नंबर ११८, सर्व्हे नंबर १७, एकूण क्षेत्र पावणेचार गुंठे असलेल्या जमिनीवर कर्जत नगरपरिषदेच्या सर्व रीतसर परवानग्या घेऊन विलास थोरवे आणि अजित लोखंडवाला यांनी भागीदारीत जमीन खरेदी केल्यानंतर बांधकामास सुरुवात केली. थोरवे यांचे भागीदार असलेल्या लोखंडवाला या मुंबईचे बांधकाम व्यावसायिकाने हिस्सा विकल्याने थोरवे एकटेच या जागेचे मालक झाले.
>नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विलास थोरवे यांनी या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर मेग्मा फायनान्स, डीएचएफएल आणि काही संशयित व्यक्तींची नावे व बोगस कागदपत्रे समोर आली. या प्रकरणात मोठे जाळे सक्रिय असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी थेट रायगडचे सहायक पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांना सविस्तर माहिती व पेपर दिले. याप्रकरणी कर्जतमधील नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनपर्यंत याप्रकरणी कोणताही छडा लागत नसल्याने त्यांनी थेट पत्रकार परिषदेत व्यथा मांडली.

Web Title: Builder's fraud in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.