खालापूरमध्ये बसला अपघात, चालकासह एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:21 AM2019-07-17T00:21:45+5:302019-07-17T00:21:51+5:30

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबाग हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास कुर्ला-भीमाशंकर एसटी बसला झालेल्या अपघातात चालकासह एक जण जखमी झाला.

A bus accident occurred in Khalapur and one injured along with driver | खालापूरमध्ये बसला अपघात, चालकासह एक जण जखमी

खालापूरमध्ये बसला अपघात, चालकासह एक जण जखमी

Next

खोपोली : मुंबई - पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबाग हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास कुर्ला-भीमाशंकर एसटी बसला झालेल्या अपघातात चालकासह एक जण जखमी झाला. ५९ प्रवासी बसमधून प्रवास करत होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
मुंबईतील कुर्ला येथून प्रवासी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस भीमाशंकर येथे जुन्या मुंबई- पुणे महामार्गाने जात असताना खालापूर तालुक्यातील कलोते गावाजवळ माधवबाग हॉस्पिटलसमोर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात जिजाबा तळेकर ( ६५ )हे प्रवासी जखमी झाले असून बस चालक विवेक मोरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलिसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे, उपअधीक्षक रणजीत पाटील, तहसीलदार इरेश चप्पलवार यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. लागलीच अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत के ली.

Web Title: A bus accident occurred in Khalapur and one injured along with driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.