बस विजेच्या खांबाला धडकली, वीजवाहक तारा पडल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:03 AM2019-02-16T00:03:11+5:302019-02-16T00:03:20+5:30

समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना बस एमएसईबीच्या खांबाला धडकल्याने जिवंत विद्युत तारा बससह रस्त्यावर पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली.

The bus hit the pole, the electricity driver fell on the road | बस विजेच्या खांबाला धडकली, वीजवाहक तारा पडल्या रस्त्यावर

बस विजेच्या खांबाला धडकली, वीजवाहक तारा पडल्या रस्त्यावर

Next

अलिबाग : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना बस एमएसईबीच्या खांबाला धडकल्याने जिवंत विद्युत तारा बससह रस्त्यावर पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. विद्युतवाहक खांब पडल्याने एमएसईबीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली.
सेंटमेरी कॉन्वेंट स्कूल शेजारीच एमएसईबीचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाहेरच मुख्य रस्त्याला लागूनच विद्युतवाहक सिमेंटचा खांब आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अलिबागकडून पेणच्या दिशेने खासगी बस जात होती. त्या वेळी बसच्या समोरून एक दुचाकीस्वार आला. त्याची बसला समोरासमोर धडक होणार असतानाच बस चालकाने बस रस्त्याच्या बाजूला घेतली. तेथे जिंवत विद्युत तारांचा सिमेंटचा खांब होता. त्या पोलला बसच्या क्लिनर बाजूकडे ठोकर लागली. त्यामुळे सिमेंटचा पोल कोलमडून बसवर पडला.

आणि मोठा अनर्थ टळला
सेंट मेरी कॉन्वेंट स्कूलमध्ये ज्युनिअर आणि सिनियर केजीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा फॅशन शो शाळेमध्ये सुरू होता. नेहमी १०.४५ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटते. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांसह पालकांची येथील रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी असते. शाळा नियोजित वेळत सुटत नव्हती. त्यामुळे काही पालकांमध्ये नाराजी होती; परंतु फॅशन शो उशिरापर्यंत सुरू असल्याने शाळा नेहमीच्या वेळत न सुटता सुमारे २५ मिनिटे उशिरा सुटल्याने मोठा अनर्थ टळला, असेच म्हणावे लागेल.

Web Title: The bus hit the pole, the electricity driver fell on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड