बायोमेट्रिक मशिनची दुप्पट भावात खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:08 AM2018-09-02T03:08:53+5:302018-09-02T03:09:03+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुण्यातील एका विक्रेत्याला हाताशी धरून आठ हजारांची बायोमेट्रिक मशिन दुप्पट रकमेने खरेदी केल्याचा प्रकार समोर येत आहे.

Buy biometric machines twice | बायोमेट्रिक मशिनची दुप्पट भावात खरेदी

बायोमेट्रिक मशिनची दुप्पट भावात खरेदी

Next

- श्रीकांत शेलार

दांडगुरी : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुण्यातील एका विक्रेत्याला हाताशी धरून आठ हजारांची बायोमेट्रिक मशिन दुप्पट रकमेने खरेदी केल्याचा प्रकार समोर येत आहे. वैद्यकीय कर्मचारी व अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून (एनआरएचएम) राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हजेरीसाठी आधार लिंक बायोमेट्रिक मशिन बसविण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी (डीएचओ) दिले.
विशेष म्हणजे या मशिनची खरेदी त्यांच्या खास माणसाकडून करण्यासाठी त्याचा संपर्कही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयाला दिला गेला. वरिष्ठांचा आदेश मानावा लागणार यासाठी काही एमओनी मशिन विक्रे त्याशी संपर्ककरून मशिन बसवून घेतली. मात्र मशिन काही दिवसांतच बंद पडली. आता मशिन दुरुस्तीसाठी दाद मिळत नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात येते. रायगड जिल्ह्यातही सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयांत मशिन बसविण्यात आले. बायोमेट्रिक हजेरीशिवाय पगार दिले जाणार नाहीत, असे तोंडी आदेशही वरिष्ठांकडून देण्यात आले होते. या आदेशाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी होणार होती. मात्र विभागातील मशिन पहिल्या दहा दिवसांतच बंद पडल्या. त्यांच्या दुरुस्तीबाबतही अधिकारी अनभिज्ञ आहेत.

आरोग्य यंत्रणा सुधारणार ?
आरोग्य यंत्रणा सुधारावी, अधिकारी व कर्मचारी वेळेत येऊन रु ग्णांना सेवा मिळावी यासाठी बायोमेट्रिक मशिन बसवण्यात आले. मात्र बहुतेक मशिन बंद पडल्या असून आरोग्य यंत्रणा आहे तशीच आहे.

मशिन खरेदीचा हेतू काय ?
आधार लिंक बायोमेट्रिक मशिन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेत हजेरी लावण्यासाठी की टक्केवारी घेण्यासाठी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जर नवीन मशिन काही दिवसांत खराब होत असेल तर कर्मचाºयांची नियमितता कशी तपासणार व त्यांचा पगार कसा काढणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

नवीन डीएचओ
नवीन मशिन
बायोमेट्रिक मशिन सर्वच पीएचसीमध्ये अगोदरच बायोमेट्रिक मशिन असताना नवीन आधार लिंक बायोमेट्रिक मशिन बसवण्याचा घाट घातला जातोय.
मागील तीन जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी नवीन मशिन बसवण्याचे आदेश दिले, मात्र मशिन काही दिवसांत खराब होतात, दुरु स्तीकडेही दुर्लक्ष केले जाते.

Web Title: Buy biometric machines twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड