जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 07:31 PM2024-05-30T19:31:05+5:302024-05-30T19:43:00+5:30

वाढवणं बंदराच्या विकासासाठी ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या करारावर स्वाक्षऱ्या 

By April 2025, more than one crore container cargo will be handled through JNPA | जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

मधुकर ठाकूर 

उरण : येत्या एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराच्या पुर्णत्वानंतर वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. 

देशातील सर्वात मोठे आणि युवा पोर्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या जेएनपीएने ३५ वर्षात पदार्पण केले आहे.३५ व्या वर्धापनाचे औचित्य साधत जेएनपीएने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राज्याचे बंदरे, वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ, विविध शिपिंग लाईन्स, भागीदार आदी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी हे भारतातील पहिले १०० टक्के जमीनदार आणि प्रमुख कंटेनर पोर्ट बनले आहे.३५ वर्षांच्या कारकिर्दीतील बंदराच्या प्रगतीचा आलेख आणि "समृद्धी बंदर" या थीमवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशंसा केली. यावेळी जेएनपीएच्या मागील ३५ वर्षातील प्रगती,
विकास, वाटचालीचा जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी आढावा सादर केला. जनेपीएने गेल्या काही वर्षांत सातत्याने दरवर्षी सहा दशलक्ष टीईयुस कंटेनरर्सची हाताळणी करीत आहे. त्याचबरोबर डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, वचनबद्धता आणि ग्रीन पोर्ट उपक्रमांमध्ये बंदराच्या धोरणात्मक पुढाकाराने उद्योगात नवीन बेंचमार्क स्थापित केले असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराची वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीए येत्या दोन महिन्यात ३८ एकलव्य मॉडेल शाळा सुसज्ज करण्यासाठी साडेतीन कोटी खर्चून एक हजार संगणक आणि १०० टॅब्लेट देणार असल्याची ग्वाही वाघ यांनी दिली. यावेळी बंदराच्या यशात दिलेल्या मौलिक योगदानाची दखल घेऊन पंचवीस जेएनपीए भागधारक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: By April 2025, more than one crore container cargo will be handled through JNPA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.