अलिबाग - पैशांचे प्रलोभन दाखवून nasdag 4pt.pages.dev या लिंकवर लॉगईन अकाउन्ट बनविण्यास सांगत अलिबाग येथील महीलेला दोन लाख 65 हाजाराचा गंडा घातल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात दोन महीलांविरोधात गुन्हा दोखल करण्यात आला आहे.
विद्यानगर येथे राहणाऱ्या स्वाती गायकवाड यांची अर्थिक फसवणूक झाली आहे. आरोपी वनिता राजबर व प्रिती मेहता यांनी 23 जानेवारी 2024 रोजी 06:30 वा ते दि. 27 जानेवारी 2024 रोजी 06:30 वा.दरम्यान स्वाती यांना nasdag 4pt.pages.dev या लिंकवर लॉगईन अकाउन्ट बनविण्यास सांगुन त्याद्वारे विविध टिंडीग टास्क करण्यास सांगीतले. तसेच लॉगईन अकाटन्टवर जमलेले पैसे 5 लाख 28 हजार 829 रुपये परत मिळण्याकरीता फिर्यादी यांचे टेलीग्राम अॅपवर वेगवेगळया लिंक पाठवुन फिर्यादी कडुन एकुण 2 लाख 64 हजार 517 रुपये घेतले व कोणतीही रक्कम परत न करता फसवणुक केली.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66 (C), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील करीत आहेत.नागंरीकांनी सजगता बालगणे गरजेचे आहे. महीलांनी अर्थिक व्यवहार करताना सावधगीरी बाळगणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही येणाऱ्या सोशल मिडीयाच्या साईडवर गुंतवणूक करताना सावधगीरी बालगणे अत्यावश्यक आहे.
- संजय पाटील, पोलिस निरीक्षक, अलिबाग पोलिस ठाणे.