पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:35 AM2018-02-21T01:35:04+5:302018-02-21T01:35:07+5:30
पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.
पनवेल : पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. तर दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत नामनिर्देशित पत्र आले नाही. त्यामुळे केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील मोरबे, खैरवाडी, आदई, विचुंबे, तरघर, वडघर, सोमटणे, वहाळ, उलवे, गव्हाण या दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोट निवडणूक पार पडणार आहे. यातील विचुंबे आणि वहाळ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. उलवे व वडघर या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र प्राप्त झाले नाही. तर मोरबे, खैरवाडी, आदई, तरघर, सोमटणे, गव्हाण या ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे केवळ विचुंबे आणि वहाळ या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. वहाळ येथे प्रभाग ५मध्ये सर्वसाधारणसाठी एका जागेवर, विचुंबे येथे प्रभाग १मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एका जागेसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी होईल.