सीए संजय राऊत यांना डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार
By निखिल म्हात्रे | Published: March 5, 2024 05:23 PM2024-03-05T17:23:51+5:302024-03-05T17:27:37+5:30
सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व कामगिरीबद्दल संजय राऊत यांची राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम सुवर्णपदक पुरस्कारासाठी निवड केली होती.
अलिबाग येथील सनदी लेखापाल संजय राऊत यांना ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रोग्रेस ऍण्ड रिसर्च असोसिएशन नवी दिल्ली यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व कामगिरीबद्दल संजय राऊत यांची राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम सुवर्णपदक पुरस्कारासाठी निवड केली होती. ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रोग्रेस ऍण्ड रिसर्च असोसिएशन नवी दिल्ली यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या आलेल्या समारंभात संजय राऊत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री डॉ. आर. वेलू, अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नईचे माजी प्र- कुलगुरू डॉ. ए. कलानिधी, ग्रीन मिशन प्रोफेशनलचे डॉ. प्रफुल्ल शिर्के आदी मान्यवर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित होते.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय राऊत यांचे समाजाच्या सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सनदी लेखापाल संजय राऊत गेले २८ वर्षे आर्थिक क्षेत्रात कार्यरत असून, पाठ्य पुस्तकातील अनावश्यक अभ्यासक्रम बदलण्यासाठी सरकारला भाग पाडणे, विविध शैक्षणिक संस्थांवर मानद सल्लागार, विविध सामाजिक कार्ये,विविध सामाजिक संस्थावर मानद सल्लागार, दिव्यांग मुले दत्तक घेणे विविध धर्मादाय संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, सेवा निवृत्त संघटन यांना विनामूल्य सल्लागार म्हणून ते काम करत आहेत. त्यांना मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे.