श्रीवर्धन : देशातील तरुणाईच्या कृतीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते. सुजाण व कर्तव्य दक्ष तरुण आपल्या विविध कृती द्वारे समाजाचे ऋण सदैव फेडत असतात. देशा प्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यात तरुण पिढी अग्रणी आहे .त्याचे उत्तम उदाहरण पुण्यातील चार तरुणांनी सायकलस्वारी द्वारे अधोरेखित केले आहे. सायकल यात्रेव्दारे हे तरूण पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती करत आहेत.
सायकल प्रेमीं ग्रुप (पुणे) तर्फे दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सायकल यात्रेचे आयोजन केले जाते. हे सायकल यात्रेचे तिसरे वर्ष आहे. पहिला वर्षी पुणे - अहमदनगर- पुणे असा ३०० किमीचा प्रवास वाहतुकीचे नियम पालन व अपघातग्रस्तांना मदत या विषयी जनजागृती केली होती. दुसऱ्या सायकल यात्रामध्ये अवयवदान जन जागृतीसाठी पुणे- चंद्रपूर अशी सायकल यात्रा केली होती. ही सायकल यात्रा साधारण ११०० किमी केली. यावर्षी किसन ताकमोडे, राजेंद्र सोनवणे, सतीश ठाकरे व गणेश मुसळे या सर्व मित्रांनी एकत्र येऊन कोकण सायकल यात्रा मोहीम सुरू केली आहे. ही सायकल यात्रा ११ दिवसाची आणि १००० किमीची आहे. सायकल यात्रामध्ये पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन विषयी जन जागृती करत आहेत. प्रवास मार्ग पुणे- महड - रायगड- महाड- हरिहरेश्वर - दापोली - गुहागर- गणपतीपुळे- चिपळूण - महाबळेश्वर- वाई - पुणे असा आहे. या प्रवासामध्ये सर्वसामान्य व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक संस्था आदी ठिकाणी तरुण भेट देत आहेत. हे सायकल स्वार हरिहरेश्वर येथे पोहचल्या नंतर सुयोग लांगी यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता कोकणातील तरुणांना गावाकडे चला या हा संदेश आपण आपल्या पुढील भ्रमंतीत द्यावा असे सांगितले. सायकल स्वारांना हरिहरेश्वरमधील जनतेने योग्य सहकार्य करत पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.आपण सर्व निसर्गाची अतोनात हनी करीत आहोत. पर्यावरणाचे संतुलन कायम बिघडत आहे, त्याचा परिमाण सर्व घटकांवर होत आहे. आपण सर्वांनी पर्यावरण संवर्धन केले पाहिजे.- राजेंद्र सोनवणे, सायकलस्वारसायकल यात्रा करण्यामागील उद्देशच्दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीचा सदूपयोग व्हावा. सर्व समावेशक विषयी घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत जनजागृती करून त्यानुसार कृतिशील बनवणे हा आहे. त्याचबरोबर निसर्ग परिसर, आपला भोवतीचा परिसर पाहणे व समाजातील प्रश्न समजवून घेऊन त्या दृष्टीने काही तरी कृतिशील उपाययोजना करणे अशा असंख्य गोष्टी आपणांस शिकायला मिळतात. ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभर जीवन जगण्यासाठी कायम प्रेरणा देत राहणार आहे असे सायकलस्वार किसन ताकमोडे यांनी सांगितले .