विदेशातून आले आणि लोकशाही उत्सवात सहभागी झाले
By निखिल म्हात्रे | Published: May 7, 2024 04:49 PM2024-05-07T16:49:21+5:302024-05-07T16:51:41+5:30
निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली.
अलिबाग - निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली. तसेच मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून गाईडच्या माध्यमातून त्यांनी संभाषण केले. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागतावर या विदेशी मंडळाने स्मित हास्य करीत सकात्मक पद्धतीने सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर खुशाली दर्शविली.
विदेशी प्रतिनिधी मंडळातील महंमद मोनिरुझ्झमन टी, जी एम शाहताब उद्दीन, नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन, सिलया हिलक्का पासिलीना, न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई या सात जणांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला. काही बाबी बारकाईने हेरून त्याच्या तशा नोंदी करून ठेवल्या आहेत. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवला आहे.
मतदान केंद्रावर मतदान करतेसमयी कोणाला भोवल अल्यास प्राथमिक उपचारासाठी कर्तव्यास असलेल्या आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी हितगूज करीत त्यांच्याकडून सखोल माहीती घेतली. तर काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तर काही ठिकाणी आकर्षक बनविलेल्या सेल्फी पाॅईन्टवर फोटो काढीत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले होते.
विदेशी मंडळाचे पथक दोन दिवसापासून जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रीया कशा पद्धतीने पार पाडली जाते हे पाहण्यासाठी रायगड लोकसभा मतदार संघ निवडला होता. त्यानुसार त्यानी दोन दिवस निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज कस चालतय हे जवळून अनुभले.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी.