शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

गावठी दारूविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:01 AM

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूच्या भट्टी व दारू नष्ट करण्याकरिता पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूच्या भट्टी व दारू नष्ट करण्याकरिता पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेंतर्गत पेण शहराजवळच्या आसनी गावच्या हद्दीत डोंगरभागांत अवैद्य गावठी दारूच्या पाच दारू भट्टी, २०० लीटर क्षमतेच्या १५ टाक्या आणि सुमारे २५०० लीटर दारूनिर्मितीचे रसायन असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा माल जागीच नष्ट करण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे.शुक्रवारी रावे गावचे हद्दीत रावे गावच्या पश्चिम खाडीकिनारी दलदलीमध्ये छापा घालून जमिनीखाली व झाडीझुडपात लपवून ठेवलेले १०० लीटर क्षमतेच्या ४० प्लॅस्टिक टाक्या, त्यातील गुळमिश्रीत रसायन, पाच मोठ्या लोखंडी टाक्या तसेच दारूनिर्मितीचे इतर साहित्य, असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा अवैध माल जागीच नाश करून कारवाई केली आहे.पोयनाड पोलीसठाण्याच्या हद्दीत श्रीगाव नाका येथे १३ हजार २९४ रुपये किमतीच्या बेकायदा दारूसह एकाला अटक करण्यात आली आहे. तर वडखळ पोलीसठाणे हद्दीत कारावी गावाच्या हद्दीत जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या गोवा गेट समोरील पाटील किराणा स्टोअर्सच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये १० हजार ३३८ रु पये किमतीच्या देशी विदेशी दारू विक्र ीचा परवाना नसताना बेकायदेशीर स्वत:च्या ताब्यात बाळगून विक्र ी करीत असताना एकाला अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलीसठाण्याच्या हद्दीत पुलाचीवाडी येथे एक हजार २८० रुपये किमतीच्या बेकायदा गावठी दारूसह एकाला अटक करण्यात आली आहे.