उनप कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरात राबविली स्वच्छता मोहीम; तासाभराच्या अभियानात ८० अधिकारी, कर्मचारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 11:07 AM2023-06-24T11:07:03+5:302023-06-24T11:13:53+5:30
एक किमी अंतरावरून २० टन डेब्रिज, कचऱ्याची विल्हेवाट.
मधुकर ठाकूर, उरण : रायगड जिल्हाधिकारीं डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतुन तसेच पनवेल उपविभागिय अधिकारी . राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुलभीकरण, सुशोभीकरण अंतर्गत उरण शहरातील आनंदनगर, वीर सावरकर मैदान ते राजपाल नाका या परिसरातील या एक किमी परिसरात शनिवारी (२४) सकाळी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत २० टन डेब्रिज कचरा उचलण्यात आला. बॅनर हटवण्यात आले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. रस्त्यावर आलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या.
या मोहिमेत उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, बांधकाम अभियंता झुंबर माने, रचना सहायक सचिन भानुसे , लेखापाल सुरेश पोसतांडेल , प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, माजी नगर सेवक तसेच उरण नगर परिषदेचे सुमारे ७०-८० कर्मचारी आदींनी सहभागी होत श्रमदान केले.
पुढील महिन्यात २६ जुलै २०२३ रोजी याच प्रकारे नागरिकांच्या सहभागतुन स्वछता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात उरण शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि श्रमदान करावे असे आवाहन उरण नगर परिषदे मार्फत करण्यात आले आहे.दर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या स्वछता मोहिमेमुळे उरण शहर कचरा मुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास उनपचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी व्यक्त केला आहे.