निवडणुकीसाठीचा प्रचार थंडावला

By admin | Published: October 12, 2016 04:49 AM2016-10-12T04:49:56+5:302016-10-12T04:52:26+5:30

मुरुड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे महिला खुला प्रवर्गासाठी पडले असून सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी शिक्कमोर्तब

The campaign for the elections was thundered | निवडणुकीसाठीचा प्रचार थंडावला

निवडणुकीसाठीचा प्रचार थंडावला

Next

नांदगाव /मुरुड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे महिला खुला प्रवर्गासाठी पडले असून सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी शिक्कमोर्तब न केल्याने सर्वच पक्षातील उमेदवार चिंताग्रस्त झालेले आहेत. आरक्षण पडल्यावर त्वरित सर्व पक्ष निवडणुकीच्या कामासाठी सज्ज होतील असा अंदाज होता परंतु नक्की तिकीट कोणाला व कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब हे निश्चित न झाल्याने सर्वच पक्षांचा प्रचार थंडावला आहे. तुरळक गाठी भेटी यावरच सद्या जोर देताना काही उमेदवार दिसत आहेत. तसेच नगरसेवक पदाची यादी येऊन पडली आहे. परंतु ती सुद्धा नावे अधिकृत जाहीर न केल्याने उमेदवार प्रचार करताना धजावत आहेत.
मुरु ड नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांची युती मानली जात आहे. परंतु दोन्ही पक्ष जोपर्यंत आमने-सामने न बसल्याने जागावाटप गणित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये बैचैनी दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या पत्नी मुग्धा दांडेकर यांचे नाव चर्चेत आहे. सोमवारी १७ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये आमदार सुनिल तटकरे हे या नावाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे असे विश्वसनियरित्या कळते. तर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी चार महिला उत्सुक असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहर अध्यक्ष्य प्रमोद भायदे यांनी केल्याने नक्की माळ कोणच्या गळ्यात पडणार हा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला आहे.
भारतीय जनता पार्टी मुरु ड नगरपरिषद निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची माहिती शहर अध्यक्ष्य प्रवीण बैकर यांनी दिली आहे. आमच्याकडे सुद्धा १७ उमेदवार व नगराध्यक्षपदाचा उमेदवारांची यादी प्रतीक्षेत असून शिवसेनेसोबत योग्य ती तडजोड व जागावाटप बोलणी झाली तरच आमची ही निवडणूक युती मधून लढवू अन्यथा आमचा पर्याय खुला असेल आमच्याकडून निवडणूक लढवण्यास अनेक जण उत्सुक असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. काँग्रेसआय पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक यांना नगरपरिषद निवडणुकी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले
नगरपरिषद निवडणुकीत आम्ही १७ पैकी १५ जागा लढवणार आहोत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा तयार आहे. जिल्हा काँग्रेस बैठकीत समविचारी पक्षसोबत युती करू शकतो. परंतु कोणत्याही पक्षाकडून तशी विचारणा न झाल्याने आम्ही तयारी पूर्ण केली आहे. शेकाप हा राष्ट्रवादीसोबत युती करणार असे स्पष्ट दिसत आहे परंतु वरिष्ठांची अद्याप बैठक न झाल्याने ही फक्त चर्चाच ऐकिवात आहे. निवडणूक तोंडावर आलेली असूनसुद्धा युती संदर्भात व जागा वाटप तिढा न सुटल्याने ही गणिते अनुत्तरित आहेत. (वार्ताहर)

Web Title: The campaign for the elections was thundered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.